Telangana Officials ACB action  Saam TV
देश विदेश

Shocking News: सरकारी अधिकाऱ्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटा मोजताना मशीन बंद, अधिकारीही थकले

Telangana ACB action: तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी (२४ जानेवारी) एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी तसेच कार्यालयावर एकाच वेळी धाडी टाकल्या. यावेळी ACB पथकाला कोट्यवधींचं घबाड सापडलं.

Satish Daud

Telangana Officials ACB action

मागील काही दिवसांपासून देशभरातील भ्रष्ट नेते, सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. लाच घेण्यासाठी अनेकदा सरकारी अधिकारी खासगी व्यक्तीचा देखील वापर करताना दिसून येत आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ACB अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर छापेमारी केली जात आहे. या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी (२४ जानेवारी) एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी तसेच कार्यालयावर एकाच वेळी धाडी टाकल्या. यावेळी ACB पथकाला कोट्यवधींचं घबाड सापडलं. पैशांची रक्कम इतकी होती, की नोटा मोजताना ACB पथकाला देखील घाम फुटला.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. एस. बालकृष्ण असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्याकडे सुमारे १०० कोटी रुपयांचं घबाड सापडलं आहे. एस. बालकृष्ण हा तेलंगणा राज्य रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चा सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी पदावर कार्यरत आहे. (Latest Marathi News)

बालकृष्ण याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, पथकाने बुधवारी भल्यापहाटे त्याच्या घरासह २० ठिकाणांवर एकाचवेळी धाडी टाकल्या. तसेच कार्यालयावर एसीबीच्या पथकांनी एचएमडीए आणि रेरा कार्यालयांची झडती घेतली.

यावेळी बालकृष्ण याच्याकडे १०० कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती सापडली. यात ४० लाख रुपये रोख, २ किलो सोने, चल-अचल मालमत्तेची कागदपत्रे, ६० महागडी घड्याळे, १४ मोबाईल फोन आणि १० लॅपटॉपचा समावेश आहे.

दरम्यान, बालकृष्ण याच्या नावे ४ बँकेत लॉकर्स देखील आहे. गुरुवारी ते एसीबी पथकाकडून उघडले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय एसीबीच्या बालकृष्ण याच्या घरी कॅश मोजण्याचे यंत्र सापडले आहे. एचएमडीएमध्ये काम केल्यानंतर अधिकाऱ्याने ही बेनामी संपत्ती कमावली होती, अशी माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT