Tej Pratap Yadav on Ram Mandir Ayodhya Saam TV
देश विदेश

Ram Mandir: २२ तारखेला मी अयोध्येत येणार नाही, असं रामाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय; बड्या मंत्र्याचं विधान

Ram Mandir Latest News: २२ जानेवारी रोजी श्रीराम अयोध्येला येणार नाहीत. श्रीरामाने माझ्या स्वप्नात येऊन मला तसं सांगितलं आहे, असं खळबजनक विधान तेज प्रताप यादव यांनी केलं आहे.

Satish Daud

Tej Pratap Yadav on Ram Mandir

अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम वेगाने सुरू असून २२ जानेवारीला मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण देखील तापलं आहे. विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अशातच बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी मंदिराबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२२ जानेवारी रोजी श्रीराम अयोध्येला येणार नाहीत. श्रीरामाने माझ्या स्वप्नात येऊन मला तसं सांगितलं आहे, असं खळबजनक विधान तेज प्रताप यादव यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून भाजपवर जोरदार टीका देखील केली आहे.

काय म्हणाले तेजप्रताप यादव?

"प्रभु श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितलं की, ते येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ते अयोध्येला येणार नाहीत. सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे. त्यामुळे मी त्या दिवशी तिकडे येणार नाही, असं श्रीरामांनी स्वप्नात येऊन मला सांगितलं आहे, असं तेजप्रताप यांनी म्हटलं आहे.

रविवारी डीएसएस या संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त बिहारमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तेजप्रताप यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर बोचरी टीका देखील केली. निवडणुका आल्या की मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कोणी विचारत नाही. कोणीही त्याबद्दल बोलत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

कोण आहेत तेजप्रताप यादव?

तेजप्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील ते मंत्री आहेत. यापूर्वी देखील तेजप्रताप यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात स्वप्नांचा उल्लेख केला होता.

तेजप्रताप यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत आधी ते झोपलेले दिसत होते. त्यानंतर ते उठले आणि म्हणाले, मी स्वप्नात भगवान श्रीकृष्णाचा रौद्र अवतार पाहिला, असं त्यांनी सांगितलं होतं. मुलायम सिंह यादव देखील आपल्या स्वप्नात आल्याचा दावा तेजप्रताप यादव यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

SCROLL FOR NEXT