Chandrababu Naidu Saam Tv
देश विदेश

Chandrababu Naidu: मोठी बातमी! आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

Chandrababu Naidu Took Oath As Andhra Pradesh CM: आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एकदा टीडीपी सरकार सत्तेत आलं आहे. चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Rohini Gudaghe

टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. टीडीपीने भाजप आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत टीडीपीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आज (१२ जून) चौथ्या वेळी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. नायडू सरकारमध्ये टीडीपीच्या २०, जनसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी नायडू सरकारमध्ये एकूण २४ मंत्री आहेत. तर पवन कल्याण यांनी देखील आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली (Andhra Pradesh CM) आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचताच त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना घट्ट मिठी मारली (Chandrababu Naidu CM Oath) होती. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्क येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तेलगू देसम पक्षाने यंदा चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात १७ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बाकीचे यापूर्वीही मंत्री राहिलेले आहेत. टीडीपी प्रमुखांनी एक पद रिक्त ठेवलं आहे. मंत्रिमंडळात तीन महिलांचा समावेश आहे.

चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारत आहेत. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री (TDP Leader Chandrababu Naidu) झाले होते. आंध्र प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी १९९५ मध्ये नायडू प्रथमच मुख्यमंत्री झाले होते. २००४ पर्यंत सलग नऊ वर्षे त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT