kashmir Accident News Saam Tv
देश विदेश

kashmir Accident News: काश्मीरमध्ये टॅक्सी नदीत कोसळून ४ पर्यटकांचा मृत्यू; तर दोघे बेपत्ता

Srinagar Accident New: जम्मू काश्मीरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्यात पर्यटकांनी पर्यटकांनी भरलेली एक टॅक्सी नदीत पडली. या अपघातात चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू काश्मीरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्यात पर्यटकांनी पर्यटकांनी भरलेली एक टॅक्सी नदीत पडली. या अपघातात चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर दोन जण जखमी तर अजून दोन पर्यटक बेपत्ता आहेत. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे, मात्र भीषण अपघाताच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २८ एप्रिल रोजी श्रीनगरमधील सोनमर्गजवळलही भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी सिंध नदीजवळून जात असताना कॅब बर्फाळ रस्त्यावरून घसरली. वाहन घसरल्याने टॅक्सी(Taxi) नियंत्रणाबाहेर जाऊन थेट नदीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की टॅक्सीमधील पर्यटक वाहून गेले.

वाहून गेलेल्या टॅक्सीमध्ये एकूण नऊ पर्यटक होते. टॅक्सी ड्रायव्हर याला किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन जण जखमी झाले तर दोन पर्यटक बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या या भागात वाहून गेलेल्या पर्यटकांची नदीत शोधमोहीम सुरु आहे. मात्र अजूनही त्या पर्यटकांचा शोध लागलेला नाही. नदीचा प्रवाह जोरात असल्याने शोधमोहीमेत अनेक अडचणी येत आहेत. सतत सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे(Snowfall) आणि पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

SCROLL FOR NEXT