Road Accident At Hingoli
Road Accident At HingoliSaam Tcv

Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा जागीच मृत्यू, हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Road Accident At Hingoli: हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संदीप नागरे साम टिव्ही, हिंगोली

हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील (Hingoli Risod National Highway) राहुली पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हिंगोलीच्या त्र्यंबकनाका राहुली पाटी परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.

हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. वैभव पाटील आणि शुभम पारसकर, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे (Road Accident At Hingoli) आहेत. या घटनेने दोन्ही तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या तरूणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ (Hingoli News) व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांचे (Died In Road Accident) सत्र सुरूच आहे. काल रात्री (२७ एप्रिल) हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरुण खासगी कामानिमित्त सेनगाव मध्ये गेले खाजगी कामानिमित्त हिंगोली वरून सेनगाव शहरात ( Accident At Hingoli) गेले होते.

रात्री सात वाजता परतीच्या (Accident News) दरम्यान हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या राहुल पाटी जवळ येताच समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत दोन्ही तरुणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.  हिंगोली ग्रामीण पोलिसांनी या तरुणांना धडक देणाऱ्या वाहनाचा (Accident Death) शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Road Accident At Hingoli
Raigad Accident : मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात अनर्थ टळला

हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दोघांचेही मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. हिंगोलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू झालाय. सध्या वाहनांचा भरधाव वेग हे अपघाताचे (Accident) प्रमुख कारण आहे.

Road Accident At Hingoli
Mumbai-Pune Express Way Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा भीषण अपघात, पोलिस उपनिरिक्षकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com