EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

How to Check PF Passbook by EPFO Portal : पगारातून कापले जाणारे पैसे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) खात्यात जमा होतात की नाहीत हे माहिती असणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळं पीएफ पासबुक ईपीएफओ पोर्टल, पासबुक लाइट किंवा उमंग अॅपच्या माध्यमातून सहजपणे तपासू शकता. जर त्यात अनियमितता आढळून आली तर तुम्ही तक्रार करू शकता.
epfo update: पगारातून PF कापलं पण खात्यात जमा नाही? असं तपासा
EPFO Updatesaam tv
Published On

how to check EPFO PF balance using UAN : तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला पगाराची रक्कम जमा होते. त्या पगारातून तुमचा पीएफ कापला जातो. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सॅलरी स्लिपमध्ये पीएफची रक्कम कापल्याचे दिसते. तुमच्या पगारातून किती पैसे कापले आहेत आणि ते पीएफ खात्यात (PF Account) जातात, हे सॅलरी स्लिपमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते. पण जो पीएफ तुमच्या पगारातून कट होत आहे, तो खरोखर तुमच्या पीएफ खात्यात जमा होतोय की नाही? हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का?

बऱ्याचदा आपण आपले पीएफ पासबुक चेक करत नाही. पगारातून कट होणारे पैसे दरमहा पीएफ खात्यात जमा होतच असतील, असं आपल्याला वाटतं. पण तसं अजिबात नाही. म्हणूनच तुम्ही वेळोवेळी तुमचं पीएफ पासबुक तपासावं, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही. तुम्ही घरी बसून तुमचं पीएफ पासबुक कसं तपासाल, हे जाणून घ्या.

पासबुकमध्ये काय पाहाल?

जेव्हा कधी तुम्ही पीएफ पासबुक पाहाल, तेव्हा काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कारण त्या खूप गरजेच्या आहेत. खात्यात दरमहा नोंद होत आहे की नाही हे नेहमी तपासून बघा. जर तुम्ही सप्टेंबरमध्ये पासबुक पाहत असाल, तर ऑगस्टचा पीएफ नोंदवला गेला आहे की नाही ते पाहा. यामध्ये फक्त तुमचा स्वतःचा हिस्साच नाही, तर कंपनीचा हिस्सा आणि पेन्शन फंडचे पैसेही नक्की बघाल.

घरबसल्या पीएफ पासबुक कसं तपासाल?

  • तुम्हाला पीएफ पासबुक तपासायचे असेल तर या तीन सोप्या पद्धती जाणून घ्या

  • EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा. यूएएन (UAN) आणि पासवर्डने लॉगिन करा. यानंतर तुमचा मेंबर आयडी निवडून पासबुक पाहा.

  • पासबुक लाइट हे EPFO चं फीचर आहे. या फीचरमुळे तुम्हाला जमा- नावे (डिपॉझिट-विड्रॉअल) आणि शिल्लक रकमेचा (बॅलन्स) एक सोपा सारांश मिळू शकतो.

  • उमंग ॲप (UMANG App) : तुमच्या फोनमध्ये उमंग ॲप डाउनलोड करून अवघ्या काही सेकंदात पासबुक आणि बॅलन्स तपासला जाऊ शकतो.

  • जर तुम्ही अनेक नोकऱ्या बदलल्या असतील, तर एकाच UAN अंतर्गत तुमच्या वेगवेगळ्या मेंबर आयडी असतील. ज्या कंपनीचा रेकॉर्ड पाहायचा असेल, त्याच कंपनीचा आयडी निवडा.

epfo update: पगारातून PF कापलं पण खात्यात जमा नाही? असं तपासा
EPFO 3.0 Big Update: PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 मध्ये UPI-ATMसह होणार ५ मोठे बदल; आता झटपट पैसे मिळणार

पीएफ जमा झाला नसेल, तर काय करावे?

तुमच्या पीएफची रक्कम खात्यात जमा झाली नसेल, तर सर्वात आधी सॅलरी स्लिप मॅच करा आणि काही दिवस प्रोसेसिंगची वाट पाहा. यानंतरही जर तुम्हाला नोंद दिसली नाही, तर लगेचच कंपनीतील एचआरशी संपर्क साधा आणि याबद्दल तक्रार करा.

epfo update: पगारातून PF कापलं पण खात्यात जमा नाही? असं तपासा
EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com