Shruti Vilas Kadam
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाचं स्वागत करत भक्तीमय वातावरण निर्माण केलं.
अभिनेता सुबोध भावे यानेही गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत केलं. त्याच्या घरातील गणरायाच्या दर्शनाची झलक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरीही गणरायाचं आगमन झालं. तिच्या घरातील गणपतीची सजावट आणि बाप्पाच्या मूर्तीची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
अभिनेता यशोमान आपटे यानेही आपल्या घरी गणरायाचं स्वागत केलं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याने भक्तीमय वातावरणात हा सण साजरा केला.
अभिनेत्री गिरिजा प्रभू हिनेही गणपतीचं आपल्या घरी स्वागत केलं. तिच्या बाप्पाच्या आगमनाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अभिनेता स्वप्नील जोशी यांनीही आपल्या घरी गणपती गणरायाचं उत्साहात स्वागत केलं. पारंपरिक पद्धतीने सजावट करत त्यांनी कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा केला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली. गणरायाच्या आगमनाची खास झलक त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली असून, तिच्या घरचा गणेशा व्हायरल झाला आहे.