Jammu kashmir Crime Saam Tv
देश विदेश

Jammu kashmir Crime: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

Jammu kashmir Crime: दहशतवाद्यांनी नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी मजुराची हत्या केलीय.

Bharat Jadhav

Jammu and Kashmir news :

दक्षिण काश्मीरच्या नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या केलीय. मजुरावर गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर पोलीस सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाच्या जवळील परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करत शोध मोहीम चालू केलीय. मागील २४ तासात ही दुसरी घटना आहे. (Latest News)

मुकेश कुमार, असे मृताचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो काही काळ पुलवामा येथे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुलवामातून मिळालेल्या एका माहितीनुसार,नौपुरालगतच्या टुममध्ये आज दुपारी सव्वा एक वाजता स्थानिक लोकांनी गोळी झाडण्याचा आवाज ऐकला. स्थानिक लोकांनी जेव्हा त्या ठिकाणी धाव घेतली तेव्हा त्यांनी एक तरुण मृतवस्थेत पडलेला दिसला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या घटनेची माहिती पोलीस आणि निमलष्करी दलाचे पथकला देण्यात आली होती. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मारल्या गेलेल्या कामगाराच्या साथीदारांचीही चौकशी करण्यात आलीय. दहशतवाद्यांनी मुकेशची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मारेकरी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम सुरू करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga: बाबा वेंगांनी सांगितली 2026 मधली तिसऱ्या महायुद्धापासून एलियन्सपर्यंतची भाकीतं

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या श्रावणी व साहिलने पटकावले सुवर्णपदक

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

SCROLL FOR NEXT