दोन बसची समोरासमोर समोरासमोर धडक
भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, २८ जखमी
सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून पोलिस तपास सुरू
या घटनेमुळे तेनकासी जिल्ह्यात पसरली शोककळा
तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी दोन बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मदुरै-सेंकोट्टई आणि तेनकासी-कोविलपट्टी मार्गावरील कदायनल्लूरजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या दोन्ही बसच्या अपघातानंतर वाहनाचा चक्काचूर झाला आहे.
चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगाने बस चालवण्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अपघातात जखमी झालेल्या २८ प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून तपास सुरू करण्यात आला आहे. तामिळनाडूतील या दुर्दैवी घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे तेनकासी जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर रस्त्यावर बघ्घ्यांची एकच गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी डॉक्टरांचं पथक देखील घटनास्थळी पोहोचलं. या पथकाने तातडीने अपघातातील मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले. तर पोलिसांनी इतर वाहनधारकांची वाहनकोंडीतून सुटका केली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्टॅलिन यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना उच्च पातळीवर मदतीचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटलं की, 'तेनकासी कादायनल्लूरमध्ये बस अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच जखमींना रुग्णालयात तातडीने उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.जखमी प्रवासी लवकरच बरे व्हावेत, ही प्रार्थना करतो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.