Husband Doing Wife Delivery At Home Saam Tv
देश विदेश

Tamil Nadu Crime News: युट्यूबवर बघून घरीच करत होता बायकोची डिलिव्हरी, पतीच्या चुकीमुळं गमावला जीव

Priya More

Tamil Nadu News: पतीची एक चूक गरोदर पत्नीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) एक व्यक्ती युट्युब (Youtube) पाहून घरीच आपल्या गरोदर पत्नीची नॅचुरल पद्धतीने डिलिव्हरी (Delivery) करत होता. पण याचदरम्यान अति रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. चेन्नईतील पोचमपल्लीनजीकच्या पुलियामपट्टी येथे ही धक्कादायक घटना घडली. याठिकाणी राहाणारी लोगनयाकी (२७ वर्षे) या महिलेचा घरीच डिलिव्हरी करताना मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी राधिका यांनी सांगितले की, २७ वर्षांची लोगनयाकी गरोदर होती. तिला प्रसवपिडा सुरु झाल्याने तिने पती मधेशला रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितलं. पण मधेश तिला रुग्णालयात घेऊन गेला नाही. त्याने घरीच पत्नीची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. युट्युबवर पाहून त्याने नॅच्युरल पद्धतीने पत्नीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला.

लोगनयाकीने बाळाला जन्म दिला खरा. पण गर्भनाळ कापताना मधेशकडून चूक झाली. त्यामुळे अति रक्तस्राव होऊ लागल्यामुळे लोगनयाकी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात युट्युबवर पाहून डिलिव्हरी करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व काही गोष्टी स्पष्ट होतील. जर याप्रकरणात पोलिसांना काही पुरावे सापडले तर आरोपी पतीला अटक देखील केली जाऊ शकते.

आरोपी पतीने युट्युबवर पाहून घरीच डिलिव्हरी कशापद्धतीने करायची याची माहिती गोळा केली होती. पण त्याच्या या धाडसी निर्णयामुळे त्याच्या पतीला आपला जीव गमवावा लागला. लोगनयाकीचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनीच पोलिसांना दिली होती. घरीच डिलिव्हरी केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

SCROLL FOR NEXT