Uttar Pradesh Accident : ४५ भाविकांना घेऊन जणारी ट्रॅक्टर ट्रॉली नाल्यात कोसळली; भीषण दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Saharanpur district : उत्तर प्रदेशातील भीषण अपघातात नऊ भाविकांचा मृत्यू झाला.
Uttar Pradesh Saharanpur district Accident News In Marathi
Uttar Pradesh Saharanpur district Accident News In MarathiSAAM TV
Published On

Uttar Pradesh Saharanpur district : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली नाल्यात कोसळली. यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार बालकांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून थेट नाल्यात कोसळली. यात ९ भाविकांचा मृत्यू झाला असून, त्यात चार लहान मुलांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. (Tajya Batmya)

Uttar Pradesh Saharanpur district Accident News In Marathi
Mumbai News: धक्कादायक प्रकार! ट्रेनच्या रनिंग रूममध्ये भरदिवसा दारु पार्टी; ३ टीटीई निलंबित

ताजपुरा परिसरात बुधवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. ४५ भाविक एका धार्मिक कार्यक्रमासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून रंडौल येथे गावी निघाले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने बचाव आणि मदतकार्य हाती घेतले होते. बुधवारीच पोलिसांना चार मृतदेह सापडले होते. सुलोचना (वय ५८), मंगलेश (वय ५०), आदिती (वय ५) आणि अर्जुन (वय १२) अशी त्यांची नावे आहेत. तर गुरुवारी पाच मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Uttar Pradesh Saharanpur district Accident News In Marathi
UP Crime News : महिलेसोबत अनैतिक संबंध, मुलीवरही ठेवायचा वाईट नजर; माय-लेकींकडून प्रियकराची हत्या

नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्याबरोबर अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे. बचावकार्य हाती घेतलेले आहे. युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहारनपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. विपीन ताडा यांनी भेट दिली. त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.

चालकाने धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले अन्...

भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत डॉ. विपीन ताडा यांनी पीटीआयला सांगितले की, काही स्थानिकांनी या मार्गावरून जाऊ नका, असं चालकाला सांगितलं होतं. पण या धोक्याच्या इशाऱ्याकडे चालकाने दुर्लक्ष केले.

मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सहारनपूर जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जावी, अशी सूचनाही आदित्यनाथ यांनी प्रशासनाला केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com