BJP worker killed in Dindigul Tamil Nadu Saam TV News
देश विदेश

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

BJP Member Hacked to Death: दिंडीगुल जिल्ह्यातील गावात भाजप कार्यकर्त्याची भररस्त्यावर हत्या करण्यात आली. टोळीच्या हल्ल्यात बालकृष्णन यांचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Bhagyashree Kamble

तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील सनारपट्टीजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात टोळीने भाजप सदस्याची भररस्त्यावर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केली. हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बालकृष्णन (वय वर्ष ३९) असे भाजप कार्यकर्त्याचे नाव असून, ते राजकापट्टी येथील रहिवासी होते. बालकृष्णन गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आपल्या मित्रांसोबत घराबाहेर पडले होते. त्यांच्या मित्रांसोबत गप्पा सुरू होत्या. अचानक त्या ठिकाणी मोटारसायकलवरून आरोपी आले. काही लोकांनी त्यांना घेरलं. नंतर धारदार शस्त्रांनी वार करत त्यांच्यावर हल्ला चढवला.

स्थानिकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. परंतु, अधिकारी पोहोचण्यापूर्वी टोळीने त्यांना संपवलं. पीडितेला रक्ताच्या थारोळ्यात टाकून तेथून पळ काढला. त्यानंतर सनारपट्टी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बालकृष्णन यांचा मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं.

सुरूवातीच्या तपासात असे दिसून आले, हत्येचे कारण आर्थिक वाद असू शकते. सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असून, आरोपींचा देखील शोध सुरू आहे. बालकृष्णन यांची हत्या नेमकी कशामुळे घडली? आरोपीने त्यांची हत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT