Language Conflict Saam tv
देश विदेश

Language Conflict : भाषावाद पेटला; हिंदी चित्रपट आणि गाण्यावर बंदी घालणार? दक्षिण भारतातील राज्य मोठा निर्णय घेणार

language conflict news : तामिळनाडूत भाषावाद पेटला आहे. तामिळनाडूत हिंदी चित्रपट आणि गाण्यावर बंदी घालण्याची तयारी करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

तामिळनाडू सरकार हिंदी भाषेविरोधात विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे

तामिळनाडूत हिंदी चित्रपट, गाणी, होर्डिंग्स यांच्यावर बंदीची शक्यता

डीएमके पक्षाचा केंद्र सरकारवर हिंदी भाषा लादण्याचा आरोप

हा निर्णय गुंतवणूक घोटाळ्यांपासून लक्ष हटवण्यासाठी असा विरोधकांचा आरोप

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात भाषावाद पेटला आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील सरकार विधानसभेत हिंदी भाषेच्या विरोधात एक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, याविषयी अधिकृतरित्या कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. तामिळनाडूतील डीएमके पक्ष सातत्याने मोदी सरकारवर हिंदी भाषा लादण्याचा आरोप करत आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तामिळनाडू राज्य सरकार हिंदी भाषेच्या विरोधात एक विधेयक आणणार आहे. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक देखील बोलावली आहे. या विधेयकात तामिळनाडूत हिंदी भाषेत होर्डिंग, बोर्ड, सिनेमा आणि गाण्यावर बंदी घालण्याची तरतूद असल्याचं सांगण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया संविधानाच्या नियमाअंतर्गतच केली जाईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

रिपोर्टनुसार, डीएमकेचे वरिष्ठ नेते टीकेएस एलनगोवन यांनी म्हटलं की, 'आम्ही संविधानाच्या विरोधात कोणतंही कृत्य करणार नाही. आम्ही संविधानातील कायद्याचं पालन करु. मात्र, आम्ही हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात आहे'.

भाजप नेते विनोज सेल्वम यांनी हा निर्णय चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'भाषेला राजकीय हत्यार म्हणून वापरलं जाऊ नये. सरकार तिरुपरणकुंदरम, करुर तपास आणि आर्मस्ट्रॉगच्या मुद्द्यावरून कोर्टावरून झटका बसला आहे. त्यानंतर डीएमके फॉक्सकॉन गुंतवणुकीवरून लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

एमके स्टॅलिन सरकारने राज्याच्या बजेटमध्ये रुपयाचं चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून मोठा राडा झाला होता. 'तामिळ भाषेच्या प्रचारासाठी हा निर्णय घेण्यात आला होता', असं डीएमकेने म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT