Accident Saam Tv
देश विदेश

Accident CCTV Footage : ३ ट्रक आणि कारचा विचित्र अपघात, ट्रक पुलावरुन खाली कोसळला; चौघांचा मृत्यू, पाहा Video

Accident Video: तमिळनाडूतील धर्मापूरी येथे बुधवारी विचित्र अपघात झाला आहे. थोपपूर घाट येथे तीन ट्रक आणि एका कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tamil Nadu Accident Viral Video:

तमिळनाडूतील धर्मापूरी येथे बुधवारी भयानक अपघात झाला आहे. थोपपूर घाट येथे तीन ट्रक आणि एका कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

या भयानक अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे तमिळनाडूतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही वाहने धर्मापुरीहून सालेमच्या दिशेने जात होते. त्यावेळी ब्रिजवर गाडी चालवताना एक ट्रेलर ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळेच हा अपघात झाला. हा ट्रक समोरील इतर वाहनांवर जाऊन आदळला.

व्हायरल व्हिडिओत महामार्गावर ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसत आहे.त्यावेळी एकामागोमार तीन ते चार ट्रक होते. महामार्गावर मध्ये असणाऱ्या एका ट्रेलर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो पुढे असणाऱ्या ट्रकला धडकला. त्यानंतर ट्रक कारला धडकली. तीन ट्रकची एकमेकांना धडक झाली. त्यात कार पूर्णपणे अडकली.ही धडक एवढी भीषण होती की, एक ट्रक अचानक पूलावरुन खाली कोसळला.

या अपघातानंतर एका ट्रकने पेट घेतला. त्यानंतर ही आग कारलादेखील लागली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस याप्रकरणी मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT