Telangana: तेलंगणा पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनीला केसांनी ओढले, व्हायरल VIDEO पाहून नागरिकांचा संताप

Telangana Viral Video: तेलंगणा उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कृष्टी विद्यापीठाची जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी आंदोलन करत आहेत. त्याचदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Telangana Protest Viral Video
Telangana Protest Viral VideoSaam Tv
Published On

Telangana Protest Video Viral On Social Media

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कृष्टी विद्यापीठाची जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी आंदोलन करत आहेत. त्याचदरम्यान पोलिसांनी एका विद्यार्थिनीचे केस ओढून तिला खाली पाडले आहे.याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य विद्यापीठाच्या कॅमप्समध्ये हे आंदोलन होत होते. उच्च न्यायलयाच्या बांधकामासाठी विद्यापीठाची जमीन देण्याचा विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचदरम्यान स्कूटीवरुन जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थिंनीचे केस ओढले आणि तिला खाली पाडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत एक विद्यार्थिनी पळताना दिसत आहे. तिच्या मागे दोन महिला पोलिस कर्मचारी स्कूटीवरुन जाताना दिसत आहे. तेव्हा स्कूटीवर मागे बसलेल्या एका पोलिसांनी त्या मुलीचे केस ओढले. त्यामुळे ती विद्यार्थिनी खाली पडते. त्यादरम्यान तिला इजा झाल्याचे दिसत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Telangana Protest Viral Video
CCTV VIDEO: कार बाजूला घेण्यावरून दोघांमध्ये वाद; तरुणाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने हल्ला

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांना तर हा संपूर्ण प्रकार काय आहे हेच माहित नाहीये. अशा काही कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. तर अनेकांनी पोलिसांच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Telangana Protest Viral Video
CCTV Footage: आईसह चिमुकल्यावर कुत्र्याचा अचानक हल्ला, पोटच्या गोळ्याच्या बचावासाठी आईची धावपळ; थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com