Coimbatore Crime News  Saam Tv News
देश विदेश

बॉयफ्रेंडसोबत मुलगी कारमध्ये रात्री गप्पा मारत होती, ३ जणांनी किडनॅप केले, अन् सामूहिक बलात्कारानंतर...

Coimbatore Crime News : कोइम्बतूरमध्ये २० वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी उपचाराधीन आहे. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Coimbatore PG hostel girl crime news : कोइम्बतूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक तरूणी पीजी हॉस्टेलमधून बॉयफ्रेंडसोबत फिरायला बाहेर पडली होती. विमानतळाच्या जवळ दोघेही कारमध्ये बसले होते. त्यावेळी तीन जणांनी २० वर्षांच्या विद्यार्थीनीचे अपहरण केले अन् सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर कोइम्बतूरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून चौकशी करण्यात येत आहे. दरम्याव, बलात्कार पीडित मुलगी मूळची मदुराईची आहे आणि ती कोइम्बतूरमध्ये शिक्षण घेत होती. ती येथे एका हॉस्टेलमध्ये राहत होती.

ही घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोइम्बतूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेत असलेल्या २० वर्षांच्या मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगी बॉयफ्रेंडसोबत होती, त्यावेळी तिघांनी किडनॅप केले अन् अब्रू लुटली. या घटनेनेनंतर कोइम्बतूर संतापाची लाट उसळली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तात्काळ तपास कऱण्यात आला. पण सीसीटीव्हीमध्ये त्यांना एकही आरोपी दिसून आला नाही. पोलिसांनी सोमवारी रात्री या प्रकरणात तीन जणांना बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जोडप्याने कोइम्बतूर विमानतळाच्या मागे वृंदावन नगर येथे कार पार्क केली होती. तेव्हा तीन जण दुचाकीवर आले. त्यांनी कारची काच तोडली आणि प्रियकरावर हल्ला केला. त्यांनी मुलीला धमकावले आणि दुचाकीवरून निर्जन ठिकाणी नेले. तिन्ही नराधमानी त्या २० वर्षाच्या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला.

मुलीच्या बॉयफ्रेंडने पीलामेडू पोलिसांना फोन केला. पोलिसांकडून रात्री ११ वाजताच्या सुमारास मुलीचा शोध सुरू केला. पहाटे ४ वाजताच्या सुमारास मुलगी निर्जनस्थळी सापडली. तिन्ही नराधम बलात्कार केल्यानंतर पळून गेले होते. मुलगी बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडलेली होती. पोलिसांनी तात्काळ मुलीला कोइम्बतूरमधील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ आरोपींचा सोध घेण्यास सुरूवात केली. काही पथकांची नेमणूक करण्यात आली. सोमवारी रात्री पोलिसांनी मदुराई जिल्ह्यातील सतीश, गुणा आणि कार्तिक या तिघांवर गोळीबार करून त्यांना अटक केली. ते रोजंदारीवर काम करणारे कामगार असल्याचे प्राथमिक तपासून समोर आले. तिघे कोइम्बतूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. तिघांनाही कोइम्बतूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT