Farooq Abdullah Saam Tv
देश विदेश

India Pakistan News: ...अन्यथा काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती होईल, असं का म्हणाले फारुख अब्दुल्ला?

Farooq Abdullah On India-Pakistan: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी भारत सरकारला शेजारील देश पाकिस्तानशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

Satish Kengar

Farooq Abdullah On India-Pakistan Relations:

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी भारत सरकारला शेजारील देश पाकिस्तानशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय चर्चेला होणाऱ्या विलंबाबाबत त्यांनी केंद्र सरकाला दोषी ठेवलं आहे. त्यांनी चर्चला अधिक विलंब झाला तर आपली अवस्था गाजासारखी होईल, असा इशाराही दिला आहे.

काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?

अब्दुल्ला म्हणाले, 'अटल बिहारी वाजपेयीजी म्हणाले होते की, मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाहीत. आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल. पंतप्रधान मोदीही म्हणाले होते, युद्ध हा पर्याय नाही आणि हे प्रकरण चर्चेने सोडवले पाहिजे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, 'नवाझ शरीफ (पाकिस्तानचे) पंतप्रधान होणार आहेत आणि ते म्हणतात की, आम्ही (भारताशी) चर्चेसाठी तयार आहोत. पण आपण वाटाघाटी करायला तयार नाही. याचे कारण काय? जर आपल्याला चर्चेतून तोडगा निघाला नाही तर, आपली परिस्थिती गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी होईल. ज्यावर इस्रायल बॉम्बफेक करत आहे.' (Latest Marathi News)

दरम्यान, नुकतेच पुंछमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. याशिवाय बारामुल्ला येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मशिदीमध्येच गोळ्या घालण्यात आल्या. याचदरम्यान त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

पाकिस्तानात 8 फेब्रुवारी 2024 रोजी होणार निवडणूक

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नुकतेच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 8 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या ईसीपी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची तपासणी करत आहे. ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. नामनिर्देशनपत्रांवरील दावे आणि हरकती 3 जानेवारीपर्यंत दाखल करता येतील आणि 10 जानेवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल. आयोग 11 जानेवारीला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT