Pune Metro New Schedule: नववर्षात पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, नवीन शेड्युल आलं समोर

Pune Metro Timetable Updated: पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांच्या प्रतीक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होईल. त्याच बरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे.
Latest Updated Pune Metro Schedule
Latest Updated Pune Metro ScheduleSaam TV
Published On

सचिन जाधव

Pune Metro Timetable (Updated):

मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी एक खूशखबर आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार होणार आहे. पुणेकरांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापर आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रो आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु असते.आता १ जानेवारी २०२४ पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रो दर १० मिनिटांच्या वेळाने मार्गिका १ व मार्गिका २ वर १२ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर ७.५ मिनिटांच्या वेळेने मार्गिका १ व मार्गिका २ वर २४ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १० मिनिटांच्या वेळेने मार्गिका १ वर ३२ व मार्गिका २ वर ३० फेऱ्या असतील. (Pune Latest News)

Latest Updated Pune Metro Schedule
Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; मध्यरात्री २०- २५ वाहनांची तोडफोड, परिसरात खळबळ

दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर ७.५ मिनिटांच्या वेळेने मार्गिका १ व मार्गिका २ वर ३२ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १० मिनिटांच्या वेळेनेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १३ फेऱ्या प्रत्येक स्थानकावरून उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रतीक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होईल. त्याच बरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे.

या आधी दिवसभरात मार्गिका १ वर ८१ फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेऱ्या होणार आहेत आणि मार्गिका २ वर ८० फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून १११ फेऱ्या होणार आहेत.

Latest Updated Pune Metro Schedule
Mumbai Crime News: गर्लफ्रेंडने शॉपिंगसाठी 1 लाख मागितले; टेंन्शनमध्ये तरुणाने थेट जीवनच संपवलं

गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन धावत होत्या. तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ८ मेट्रो ट्रेन धावणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळेत मार्गिका १ व २ वर ४ मेट्रो ट्रेन धावत होत्या. तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन धावणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com