Pakistan Afghanistan Border Tensions 
देश विदेश

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा क्रूर चेहरा! अफगाणिस्तानवर बॉम्ब हल्ला, ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू

Pakistan airstrike on Afghanistan latest news : खोस्त, कुनार आणि पक्तिका प्रांतांवर पाकिस्तानने हवाई हल्ला केल्याचा तालिबानकडून आरोप करण्यात आला. या हल्ल्यात ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Pakistan Afghanistan Border Tensions : पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केल्याचा आरोप तालिबानकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात ११ चिमुकल्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४ जण जखमी झाल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. बुधवारी पाकिस्तानने हा हल्ला केल्याचा आरोप तालिबानकडून करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमधील तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानने खोस्त, कुनार आणि पक्तिका या प्रांतांवर हल्ले केले. काल रात्री पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा अफगाण हवाई हद्दीचे उल्लंघन केले. त्यांनी कुनार, खोस्त आणि पक्तिका प्रांतांमधील नागरिकांच्या घरांवर बॉम्ब हल्ला केला, अशी पोस्ट मुजाहिद यांनी एक्सवर केली.

झबिहुल्ला मुजाहिद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पाकिस्तानच्या या हल्ल्यांमध्ये ११ मुलांचा, एका महिलेचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महिला आणि मुलांसह १४ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. याचे प्रत्युत्तर त्यांना मिळेल. तालिबानकडून करण्यात आलेला आरोप पाकिस्तान सरकारने मान्य केला नाही, त्यांनी याचे खंडन केले.

Best Bus Accident : फेब्रुवारी २०२४ मध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत गेला आहे. मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील तणाव सुरू आहे. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT