Taiwan Earthquake Saam Tv
देश विदेश

Earthquake VIDEO: तैवानमध्ये एका रात्रीत ८० भूकंपाचे धक्के; इमारती हादरल्या, VIDEO समोर

Taiwan Earthquake News: सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत तैवानमध्ये भूकंपाचे 80 हून अधिक धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तैपेईमधील अनेक इमारती हादरल्या आहेत.

Rohini Gudaghe

तैपेई तैवानचा पूर्व किनारा पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरला आहे. सोमवारी (२२ एप्रिल) रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत तैवानमध्ये भूकंपाचे 80 हून अधिक धक्के जाणवले (Taiwan Earthquake VIDEO) आहेत. यातील सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तैपेईमधील अनेक इमारती हादरल्या आहेत. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे नागरिक भयभीत झाल्याचे दिसलं. परंतु, कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त (Earthquake News) नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला या बेटावर ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. १,००० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा भूकंप ग्रामीण आणि डोंगराळ हुआलियन काउंटीच्या (Taiwan Earthquake) किनारपट्टीवर केंद्रीत होता. हा तैवानमधला गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप होता.

वीस दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपातून तैवानचे लोक अद्याप पूर्णपणे सावरले नव्हते, तेच पुन्हा एकदा तैवान भूकंपाने हादरलं आहे. एका रात्रीत येथे भूकंपाचे 80 धक्के जाणवले आहेत. या भूकंपानंतर 3 एप्रिलच्या भूकंपात नुकसान झालेल्या इमारती (Taiwan Earthquake News) आता एका बाजूला झुकल्या आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियनच्या ग्रामीण पूर्वेकडील काऊंटीमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे.

येथे ३ एप्रिल रोजी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये सुमारे १४ लोकांचा मृत्यू झाला होता. या शक्तिशाली भूकंपानंतर, तैवानमध्ये शेकडो भूकंप झाले आहेत. हुआलियनच्या अग्निशमन विभागाने ( 80 Earthquake Tremors In Taiwan) सांगितलं की, ३ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपानंतर एका हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काल रात्री झालेल्या भूकंपानंतर ते आणखी झुकले आहे. परंतु ते हॉटेल बंद होते, त्यामुळे जीवितहानी टळल्याची माहिती मिळत आहे.

तैवान दोन टेक्टॉनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ स्थित आहे. त्यामुळे तैवानमध्ये अनेकदा जोरदार भूकंप जाणवतात. २०१६ मध्ये दक्षिण तैवानमध्ये एका अतिशय शक्तिशाली भूकंपात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला (Earthquake Tremors) होता. तर १९९९ मध्ये ७.३ तीव्रतेच्या भूकंपात दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

SCROLL FOR NEXT