Know About Reason of Taiwan's Earthquake? and What is Ring of Fire in Pacific Ocean? saam tv
देश विदेश

Taiwan Earthquake Reason: तैवान, जपानमध्ये नेहमी भूकंप का येतो? उद्ध्वस्त करणारा 'रिंग ऑफ फायर' नेमका काय आहे?

Vishal Gangurde

Taiwan Earthquake Reason :

तैवानमध्ये भूकंप येणे सामान्य बाब आहे. गेल्या वर्षी तैवानमध्ये २५ वर्षांतील सर्वात मोठा भूकंप आला होता. काल तैवान तर आज जपान भूंकपाने हादरलं आहे. तैवान आणि जपानमधील भूकंपाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या भागात नेहमी भूकंप का येतात, जाणून घेऊयात.

तैवानमध्ये नेहमी भूकंप का येतो?

तैवान, पेरू, चिली , जपान, कॅनडा इत्यादी. पॅसिफीक महासागराजवळील देशांमध्ये सर्वात जास्त भूकंप येतात. त्याचं सामान्य कारण 'रिंग ऑफ फायर' आहे.

रिंग ऑफ फायर म्हणजे काय?

पॅसिफीक महासागर जगातील सर्वात मोठा समुद्र आहे. या समुद्रात 'रिंग ऑफ फायर' हा ज्वालामुखी आणि भूकंपाचा पट्टा आहे. या समुद्रात घोड्याच्या नाळसारखा दिसणारा भाग ४०,२५० किलोमीटर लांब आहे. जगातील सर्वात अधिक भूकंप हे याच भागात येतात. या रिंग ऑफ फायरमध्ये तैवान व्यतिरिक्त अमेरिका, इंडोनेशिया, मेक्सिको, जपान, कॅनडा, रशिया, ग्वाटेमाला, चिली, पेरू आणि फिलीपिन्स सारखे देश येतात.

रिंग ऑफ फायरमध्ये भूकंप का येतात?

रिंग ऑफ फायर'मध्ये अनेक टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. यामध्ये युरेशियन, नॉर्थ अमेरिकन , कोकोस, कॅरेबियन, नाजका, अंटार्कटिक , भारतीय, ऑस्ट्रेलियन, फिलीपिन्स आणि इतर छोट्या प्लेट्सचा सामावेश आहे. या सर्व प्लेट्सने पॅसिफिक महासागराच्या प्लेट्सला घेरलं आहे. या प्लेट्स सातत्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतात. या प्लेट्स एकमेकांना धडकत असतात. या प्लेट्समुळे 'रिंग ऑफ फायर'मध्ये शेकडो ज्वालामुखी आहेत.

तैवानच्या भूकंपात ९ जणांचा मृत्यू

दरम्यान, जपानचा शेजारील देश तैवानध्ये बुधवारी शक्तिशाली भूकंप झाला. तैवानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. तैवानमध्ये झालेल्या भूकंपात ९ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक इमारतींचे नुकसान झालं आहे.

तैवानमध्ये भूकंपाननंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तर आज जपान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. जपानमध्ये रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी मोजली गेल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाच्या केंद्राची खोली ३२ किमी होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT