A brave civilian disarms a gunman during a shooting incident at Sydney’s Bondi Beach. saam tv
देश विदेश

Sydney Mass Shooting: निडर! मृत्यूसमोर असतानाही धाड धाड गोळ्या झाडणाऱ्यांचा आवळला गळा अन् हिसकावली रायफल| हल्ल्याचा थरार Video Viral

Sydney Mass Shooting Video: व्हिडिओमध्ये हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहे. त्यावेळी एक व्यक्ती स्वतःच्या जीवाच्या भीती नं बाळगता त्याने गोळीबार करणाऱ्याला धरलं, त्याच्या हातातून रायफल हिसकवली.

Bharat Jadhav

  • सिडनीच्या बॉन्डी बीचवर गोळीबाराची थरारक घटना घडली.

  • हनुक्का सणाच्या पहिल्या रात्री कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला.

  • काळ्या पोशाखातील दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर गोळीबार झाला. ज्यू समुदाय हनुक्का सणाची पहिली रात्र साजरी करत असताना हा हल्ला झाला. हा सण १४ डिसेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हनुक्का सणाची पहिली रात्र साजरी करत असतानाच गोळीबार झाला. ही घटना "हनुक्का बाय द सी" नावाच्या एका सामुदायिक कार्यक्रमादरम्यान घडली, या कार्यक्रमात शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काळ्या पोशाखात असलेल्या दोन हल्लेखोरांनी पुलावरून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामुळे घटनास्थळी दहशत पसरली.

लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या मते, या हल्ल्यात १० मृत्यू झालाय. यात एका हल्लेखोराचा समावेश आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात अंदाधुंद गोळीबार करणारा एक व्यक्ती दिसत आहे. त्याचवेळी एक नीडर ऑस्ट्रेलियन व्यक्तीनं त्याला पकडत त्याच्या हातातील रायफल हिसकावली.

धाडसी माणसाने हल्लेखोराच्या हातील शस्त्र घेतल्यानंतर त्याला खाली पाडलं. त्याच्या धाडसाबद्दल आता सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. १५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, नि:शस्त्र माणूस पार्क केलेल्या गाड्यांमागे लपलेला दिसतोय. तो बंदूकधारी व्यक्तीकडे धावतो, त्याला पाठीमागून धरत त्याचा गळा आवळतो. त्यानंतर त्याची रायफल हिसकावून घेतो. बंदूकधारी व्यक्ती जमिनीवर पडतो आणि तेव्हा ऑस्ट्रेलियन व्यक्ती हल्लेखोरावर बंदूक रोखतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT