AAP MP Swati Maliwal Assault Case Suspected Accused Bibhav Kumar Disappeared From Home ANI
देश विदेश

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

AAP MP Swati Maliwal Assault Filled FIR: आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर कथित हल्ल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून कारवाई केली जातेय.

Bharat Jadhav

'आप' च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर कथित हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडवर आलीय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय आणि स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांनी मालीवाल यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांकडून बिभव कुमार यांना अटक केली जाण्याची शक्यता.

दिल्ली पोलिसांचे पथक बिभव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पण विभव कुमार घरी नसल्याची माहिती मिळालीय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोरही दाखल करण्यात येणार आहे. १३ मे रोजी घडलेल्या घटनेवर दीर्घकाळ मौन धारण केल्यानंतर मालीवाल यांनी गुरुवारी त्यांची अडीच पानी तक्रार दिल्ली पोलिसांत नोंदवलीय.

दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आज स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवालही समोर येणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे समोर आले आहे की, मालीवाल यांच्या चेहऱ्यावर अंतर्गत जखमा होत्या, इतर काही ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT