Veteran BJP leader and former Karnataka minister S.V. Ramachandra Gowda, who passed away at the age of 88 in Bengaluru. saam tv
देश विदेश

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्याचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, राजकीय वर्तुळात शोककळा

S V Ramachandra Gowda Death News Karnataka: कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एस. व्ही. रामचंद्र गौडा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन. बेंगळुरूत उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकीय वर्तुळात शोककळा.

Omkar Sonawane

कर्नाटकातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री एस. व्ही. रामचंद्र गौडा यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ८८ वर्षीय रामचंद्र गौडा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बेंगळुरूच्या चंद्र लेआउट परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी ६:२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर कामाक्षीपाल्या येथील त्यांच्या खासगी जागेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी कुटुंबीयांसह अनेक राजकीय नेते आणि समर्थक त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

बी.एस. येदियुरप्पा यांनी व्यक्त केला शोक

ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी रामचंद्र गौडा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, मी माझा अनेक दशकांचा सहकारी आणि भाऊ गमावला आहे. जनसंघाच्या काळापासून आम्ही खांद्याला खांदा लावून पक्ष बळकट करण्यासाठी काम केले. त्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात, असे ते म्हणाले. येदियुरप्पा यांनी कॅबिनेटमधील सहकार्याच्या आठवणी सांगताना, त्यांच्या जाण्याने पक्षात आणि सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असेही नमूद केले.

राजकीय प्रवास आणि महत्त्वाची पदे

रामचंद्र गौडा हे कर्नाटकमधील भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते मानले जात होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, रेशीम उत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, लघु बचत तसेच खनन व भूविज्ञान ही महत्त्वाची मंत्रालये त्यांनी सांभाळली होती. एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जेडीएस आघाडी सरकारमध्येही त्यांनी लघु बचत, खनन व भूविज्ञान आणि विज्ञान व तंत्रज्ञान खात्यांची जबाबदारी निभावली होती. तसेच बी.एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये ते वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात कर्नाटकमध्ये लॉटरीवर बंदी घालण्यात आली होती.

आरएसएसशी नाळ, जनसंघाचे बळकटीकरण

रामचंद्र गौडा यांचा राजकीय प्रवास शालेय जीवनातच सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. हायस्कूलमध्ये असतानाच त्यांनी ‘गोवा मुक्ती आंदोलनात’ सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानंतर ते भारतीय जनसंघात दाखल झाले आणि पक्ष विस्तारात मोठे योगदान दिले. १९७० साली ते जनसंघाचे सदस्य म्हणून बेंगळुरू सिटी कॉर्पोरेशनमध्ये निवडून आले. त्याच वर्षी सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट बोर्ड (CITB) साठीही त्यांची निवड झाली. पुढे भाजपचे प्रदेश महासचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे संघटना मजबूत करण्यासाठी आणि राज्यात पक्षाची पायाभरणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vegetable Price Hike Maharashtra : सर्वसामान्यांना मोठा धक्का! राज्यभरात भाजीपाल्याचे दर गगनाला, कोणती भाजी किती महागली?

हॉटेल स्टाईल चिया सीड्स लिंबू पाणी ड्रिंक घरी कसं बनवायचं?|Chia Seeds Lemon Water Drink

Maharashtra News Live Update: धर्मपुरीत पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; भव्य स्वागत कमान उभारली

Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

Salted Peanuts Benefits : हृदयापासून ते वजन कंट्रोल करण्यापर्यंत, मूठभर खारट शेंगदाणे ठरतात वरदान

SCROLL FOR NEXT