Sushila Karki to take charge as Nepal’s interim Prime Minister after Oli’s resignation. saam tv
देश विदेश

Sushila Karki: नेपाळची संसद बरखास्त; सुशीला कार्की होणार हंगामी पंतप्रधान

Sushila Karki Interim Prime Minister: हिंसक आंदोलन आणि पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील राजकीय हालचालींना वेग आलाय. आता सुशीला कार्की नेपाळची सूत्रे हाती घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आज रात्री अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.

Bharat Jadhav

  • पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये मोठं सत्तांतर.

  • सुशीला कार्की यांची हंगामी पंतप्रधानपदासाठी निवड झाली.

  • आज रात्रीच शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त.

नेपाळच्या हंगामी पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांचे नाव मंजूर करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्की आज रात्रीच अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्की यांचा राष्ट्रपती भवनात अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील राजकीय पक्षांच्या बैठकीत संसद भंग करण्यास मुंजरी देण्यात आलीय.

संसद भंग करण्यात येईल म्हणजे, नेपाळमधील परिस्थितीत साधारण होईल आणि तेथे पुन्हा निवडणुका घेतल्या जातील. नेपाळमध्ये झेन-जीनी सरकारविरोधात हिंसक आंदोलन केलं. या आंदोलनामुळे ओली यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. तेथील तरुणाने संसदेवर हल्ला करून तेथे जाळपोळही केली. सोशल मीडियावरील बंदीमुळे संतप्त झालेल्या जमावाने माजी पंतप्रधानांच्या पत्नीलाही जिवंत जाळल्याचं वृत्त आहे.

नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष देवराज घिमिरे आणि वरिष्ठ सभागृहाच्या राष्ट्रीय सभागृहाचे अध्यक्ष नारायण दहल यांनी शुक्रवारी सध्याचा राजकीय पेचप्रसंग संविधानाच्या कक्षेतून सोडवण्याचे आवाहन केले. घिमिरे आणि दाहाल यांचे संयुक्त निवेदन अशा दिवशी आले जेव्हा राष्ट्रपती कार्यालयात एक महत्त्वाची बैठक सुरू होती. त्याच बैठकीत सुशीला कार्की यांना देशाचे अंतरिम पंतप्रधान करण्यावरही एकमत झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT