supriya sule  saam tv
देश विदेश

Supriya Sule in Lok Sabha : सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर घणाघात; ९ वर्षांच्या कारभाराचा पाढाच वाचला

Political News : ९ वर्षात ९ सरकार भाजपने पाडली सगळ्याची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.

साम टिव्ही ब्युरो

No Confidence Motion 2023 : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.  अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणण मांडलं. यावेळी विविध मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली.

मोदी सरकारने ९ वर्षात काय केलं याचा पाढाच सुप्रिया सुळे यांनी वाचला. महागाई, एलपीजीच्या वाढलेल्या किंमती, अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, ९ वर्षात ९ सरकार भाजपने पाडली सगळ्याची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. (No Confidence Motion)

शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का?

मोदी सरकार शेतकरीविरोधी काम करत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन मोदी सरकारने दिलं होते. कोणत्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, ते सरकारने स्पष्ट करावं. कांदा, दूध उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

वंदे भारतचा उपयोग काय?

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु केली चांगली गोष्ट आहे. मात्र गरीबांसाठी जास्त ट्रेन वाढवल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं. वंदे भारत ट्रेन कुठे थांबतात. वंदे भारत ट्रेन लोकांना फक्त पाहायला ठेवल्या आहेत. वंदे भारत गरीबांसाठी नाही, तर गरीब रथ गरीबांसाठी आहे. आम्ही ट्रेनचे थांबे वाढवण्याची मागणी करतोय, पण पूर्ण होत नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

तर ओएनजीसीही विकाल

केंद्र सरकारचं कर्ज वाढत चाललं आहे. हे कर्ज आपण कसं फेडणार आहात. यामुळे तुम्हाला एलआसी, आयडीबीआय विकावं लागतंय, उद्या तुम्ही ओएनजीसी देखील विकून टाकाल. यामुळेच आम्ही हा अविश्वास प्रस्ताव मांडला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. लोक मरत आहेत, घरं जळत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहे. मात्र केंद्र सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे. सरकारला मात्र मणिपूरचं काही पडलं नाही, असं दिसून येतंय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT