SUPREME COURT STAYS MADRAS HC ORDER IN TAMIL NADU COW SLAUGHTER CASE saam tv
देश विदेश

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

Supreme Court Stays Madras HC Order on Cow Slaughter Ban: तामिळनाडूमधील गोवंश हत्येबाबतच्या नियमांवरून मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या याचिकेवर नोटीस जारी केली आहे.

Bharat Jadhav

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती

प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

गोवंश हत्या नियमांबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार

तमिळनाडूमध्ये गौहत्या बंदी पूर्णपणे हटवण्यात आलीय. गौहत्या बंदीबाबत मद्रास हायकोर्टने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टानं बदलला आहे. राज्य सरकारनं गोहत्या बंदी हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवला होता. सर्वाच्च न्यायालयाने राज्याच्या नियमांचा हवाला देताना सांगितलं की, १० वर्षापेक्षा अधिक वयाच्या गोवंशची हत्येला कायद्यानुसार कोणतीच बंदी नाहीये. परंतु हायकोर्टनं त्याव्यतिरिक्त निर्णय दिला होता. (Supreme Court Stays Madras Hc Order In Tamil Nadu Cow Slaughter Case)

'बार अँड बेंच'च्या वृत्तानुसार तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या याचिकेवर नोटीस जारी केली आहे. पुढील सुनावणीपर्यंत उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

तमिळनाडू सरकारनं सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडली?

गोहत्या बंदीसंदर्भात तमिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितलं की, मूळ याचिका ही केवळ बकरी ईदच्या काळात अधिकृत कत्तलखान्यांच्या बाहेर गायी आणि वासरांची कथित कत्तल होण्याच्या मुद्द्यापुरती मर्यादित होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण राज्यात गायींच्या कत्तलीवर पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले.

ही कृती याचिकेच्या कक्षेबाहेरची होती आणि कायद्याशी सुसंगत नव्हती, असा तमिळनाडू सरकारने युक्तिवाद केला. दरम्यान मद्रास हायकोर्टानं २७ मे रोजी आदेश दिले होते की, संविधान अनुच्छेद ४८ आणि १९७६ मध्ये तमिळनाडू सरकारने जारी केलेल्या गौहत्या निषेध संबंधीच्या आदेशचा हवाला देताना सरकारने निर्देश दिले की बकरी ईदसह कोणत्याही दिवशी गाय किंवा गोवंशाची हत्या करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT