Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni Saam Tv
देश विदेश

MS Dhoni : १५० कोटींचा व्यवहार, टीम इंडियाचा माजी कर्णधार एम. एस धोनीला सुप्रीम कोर्टाची नोटीस

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. धोनी आणि आम्रपाली ग्रुपमध्ये पैशांचा व्यवहार सुरु असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नुकतीच सुनावणी झाली. आम्रपाली ग्रुपचे ब्रॅंड अॅम्बेसेडर एम एस धोनी आणि आम्रपाली ग्रुपमध्ये तब्बल १५० कोटीं रुपयांचा (150 crore rupees deal) व्यवहार सुरु आहे. धोनीचे १५० कोटी रुपये (Amrapali Group) आम्रपाली ग्रुपकडे आहेत. धोनीला या पैशांचे येणे आहे. तर दुसरीकडे ग्रुपच्या ग्राहकांना त्यांचे फ्लॅट मिळत नाहियेत. त्यामुळे हे सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहे.

आम्रपाली ग्रुप आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात सुरु असलेलं पैशांच्या व्यवहाराचं प्रकरण यापूर्वी दिल्ली हायकोर्टात सुरू होतं. त्यावेळी हायकोर्टाने एक समिती गठीत केली होती. निवृत्त न्यायाधीश वीणा बिरबल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीकडे हे प्रकरण मार्गी लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

जेव्हा समिती स्थापन केली होती, त्यानंतर तक्रारदारांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेलं होतं. आम्रपाली ग्रुपकडे निधीची कमी आहे, असं तक्रारदारांकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांच्याकडून बुक केलेले फ्लॅट्स ग्राहकांना मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. धोनीने १५० कोटी रुपयाचं येणं असल्याचं प्रकरण दिल्ली हायकोर्टाने गठीत केलेल्या समितीकडे दाखल केलं.

धोनी आम्रपाली ग्रुपचे ब्रॅंड अॅम्बेसेडर होते. या संबंधीत असलेल्या व्यवहाराचे धोनीला १५० कोटी रुपये येणं आहे, अशी माहिती तक्रारदारांनी कोर्टात सादर केली. जर आम्रपाली ग्रुपकडून धोनीला पैसे दिले, तर त्यांना फ्लॅट्स मिळणार नाहीत, असंही तक्ररदारांनी कोर्टात सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

SCROLL FOR NEXT