Supreme Court Order to Ban on Two Finger Test Latest News  Saam TV
देश विदेश

बलात्कार प्रकरणात 'टू फिंगर टेस्ट'वर बंदी, सुप्रीम कोर्ट म्हणाले, कठोर कारवाई होणार!

बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्टवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. निकाल देताना सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ? वाचा सविस्तर

साम ब्युरो

नवी दिल्ली: बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्टवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. अशा प्रकारे कुणी चाचणी करत असेल तर, संबंधितांना दोषी ठरवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

बलात्कार आणि हत्येच्या एका प्रकरणात निर्णय देताना न्या. चंद्रचूड यांनी टू फिंगर टेस्टवर बंदी घालतानाच, असं करणाऱ्यांना दोषी ठरवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (Supreme Court)

टू फिंगर टेस्ट प्रकरणात सुप्रीम कोर्ट म्हणाले की, असं करणाऱ्यांना दोषी मानले जाईल. अजूनही टू फिंगर टेस्ट केली जात आहे ही बाब खेदजनक आहे. न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठाने निर्णय देताना कठोर टिप्पणी केली आहे. या कोर्टाने बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात अशा प्रकारच्या चाचणीवर वारंवार आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारच्या चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे. (Breaking Marathi News)

न्या. चंद्रचूड यांनी या प्रकरणात कठोर टिप्पणी करताना म्हटले की, टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर खटला चालवला जाईल. अशा प्रकारच्या चाचणीमुळं पीडितेवर पुन्हा मोठा आघात होतो. मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमातून अशा प्रकारच्या चाचण्या रद्द करण्याचे आदेश देतानाच बलात्कार पीडितेची अशा प्रकारची चाचणी करणे म्हणजे तिच्यावर मोठा आघात असतो. यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आरोपीला मुक्त करण्याचा निर्णय बदलला आणि बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सन २०१३ मधील एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने टू फिंगर टेस्ट असंवैधानिक असल्याचे म्हटले होते. बलात्कार पीडितेच्या सन्मानाचे हनन करणारी आणि तिला मानसिक आणि शारीरिक वेदना देणारी ही चाचणी असल्याची टिप्पणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT