Supreme Court Latest News Update SAAM TV
देश विदेश

Supreme Court on Mumbai Metro: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारले, मुंबई मेट्रोला ठोठावला 10 लाखांचा दंड

Chandrakant Jagtap

Supreme Court on Aarey forest: मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडल्याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही तुम्हाला ८४ झाडे तोडण्याची परवानगी दिली, तरी देखील मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अवमान केला असे म्हणत न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे.

तसेच, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणखी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई मेट्रोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम मुख्य वनसंरक्षकांकडे जमा करण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रोला 15 मार्च 2023 च्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाचे पालन करण्यास सांगितले.

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या परवानगीवरून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हणाले की, 84 झाडे तोडण्याची परवानगी असताना तुम्ही (महाराष्ट्र सरकार) 185 झाडे तोडण्याच्या उद्देशाने वृक्ष प्राधिकरणाकडे गेला होता. असे करून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) न्यायालयाचा अवमान केला आहे.

सरकारवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला गरज होती तेव्हा आम्ही परवानगी दिली होती. मात्र तुम्ही आणखी झाडे तोडण्यासाठी थेट वृक्ष प्राधिकरणाकडे गेलात. सुनावणीदरम्यान सीजेआय न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, आम्ही 84 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. तुम्हाला आणखी झाडे तोडायची होती तर तुम्ही आमच्याकडे योग्य कारणे आणि सूचना घेऊन आमच्याकडे यायला हवं होतं, वृक्ष प्राधिकरणाकडे नाही. (Mmubai news)

न्यायालयाने संतप्त होत म्हटले की, या कामासाठी एमएमआरसीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते, हे अवमानाचे गंभीर प्रकरण आहे. दरम्यान न्यायालयाची भूमिका पाहून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बिनशर्त माफी मागितली आणि प्रतिज्ञापत्र दाखल करणे देखील मान्य केले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT