CM arvind kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind kejriwal : CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार!

CM arvind kejriwal News : अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागणार आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना उन्हाळाच्या सुट्टीकालीन पीठाने जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी तब्येत ठीक नसल्याच्या कारणावरून तपासण्या करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात मिळालेला जामीन वाढवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन पीठाचा जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती महेश्वरी यांनी सरन्यायाधीशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. सरन्यायाधीश यावर सुनावणी घेतील, असे न्यायमूर्ती महेश्वरी म्हणाले. सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना २ जूननंतर पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी काय मागणी केली होती?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामीनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी अशी विनंती केली होती.

अरविंद केजरीवाल सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामिनावर बाहेर आहेत. अरविंद केजरीवाल यांना २ जूनपर्यंत कोर्टात अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने जामीनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT