Nupur Sharma  Saam TV
देश विदेश

Nupur Sharma : सर्वाेच्च न्यायालयाचा नुपूर शर्मा यांना माेठा दिलासा

आज शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्याबद्दल देशभरात गुन्हा दाखल झालेल्या नुपुर शर्मा (nupur sharma) यांना आज (मंगळवार) सर्वाेच्च न्यायालयात (supreme court) दिलासा मिळाला आहे. शर्मा यांच्या विराेधात देशभरात नोंदवण्यात आलेले सर्व तक्रारीतून त्यांना अटकेपासून सरंक्षण मिळाले आहे. (nupur sharma latest marathi news)

शर्मा यांच्यावतीने त्यांच्या विराेधातील सर्व एफआयआर रद्द करा अथवा त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्व एफआयआर एकत्रित करुन त्या दिल्लीला हस्तांतरित करा या दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्य कांत (Surya Kant) आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला (JB Pardiwala) यांनी शर्मांना दिलासा दिला आहे.

अंतरिम उपाय म्हणून नुपूर शर्मा यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी शर्मा यांना हायकोर्टात जाण्याची परवानगी देण्याचा पर्याय असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना फटकारलं हाेते. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे, असं म्हणत न्यायालयाने बेजबाबदार विधानबाबत टीव्हीवर जाऊन माफी मागावी असे निर्देश दिले हाेते. त्यानंतर शर्मा हिने संबंधित याचिका पुनरुज्जीवित करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून केली हाेती.

या राज्यांत नुपुर शर्मा यांच्यावर एफआयआर दाखल आहे.

दिल्ली (1), महाराष्ट्र (5), पश्चिम बंगाल (2) आणि तेलंगणा (1) या चार राज्यांमध्ये शर्मा विरुद्ध 9 एफआयआर खाली नोंदवले आहेत.

पायधोनी पोलीस स्टेशन, मुंबई, महाराष्ट्र (28 मे)

सायबर सेल पोलीस स्टेशन, हैदराबाद, तेलंगणा (30 मे)

मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे, महाराष्ट्र (30 मे)

भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र (30 मे)

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे, महाराष्ट्र (31 मे)

नरकेलडांगा पोलीस स्टेशन, पश्चिम बंगाल (4 जून)

दिल्ली पोलिस IFSO, नवी दिल्ली (6 जून)

नानलपेठ पोलीस स्टेशन, परभणी, महाराष्ट्र (13 जून)

एमहर्स्ट पोलीस स्टेशन, कोलकाता, पश्चिम बंगाल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT