Citizenship Amendment Act SC Yandex
देश विदेश

CAA वर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरकारकडे मागितलं ३ आठवड्यात उत्तर

Bharat Jadhav

Supreme court On Citizenship Amendment Act :

सर्वोच्च न्यायालयात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातून २०० याचिका दाखल झाल्या होत्या. आज या याचिकांवर सुनावणी होत आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने CAA वर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यास नकार दिलाय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर केंद्र सरकारने उत्तर देण्यास ३आठवड्यांचा वेळ दिलाय.(Latest News)

सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी सरकारला प्रश्न केलाय. अधिसूचनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला उत्तर देण्यासाठी सरकारला किती वेळ लागेल असा सवाल न्यायालयाने केलाय. तर कायदा रद्द करण्यासाठी याचिका दाखल झाल्याने कायदा रद्द करावा असं, याचिकाकर्त्यांनी मागणी केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारची बाजू मांडणारे सॉल‍िस‍िटर जनरल म्हणाले की उत्तर देण्यासाठी सरकारला ४ आठवड्यांचा वेळ द्यावा. कायदा लागू करण्याची अधिसूचना ४ वर्ष ३ महिन्यानंतर जाहीर करण्यात आली. पण जर नागरिकता देणं सुरू झालं तर हा कायदा मागे घेणं अशक्य होईल. नोटिफिकेशनव बंदी आणली पाहिजे.

ज्या काही लोकांना नागरिकता देण्यात आलीय त्याला काही अर्थ राहणार नाही कारण अधिसुचनेवर रद्द केली जाईल, असं वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले. कोणाला नागरिकत्व मिळो किंवा न मिळो त्यामुळे याचिकाकर्त्यांना काही फरक पडणार नाही, असं सॉल‍िस‍िटर जनरल तुषार मेहता म्हणाले. हा घटनात्मक चौकशीचा विषय आहे, इंदिरा जय सिंह म्हणाल्या. दरम्यान, या कायद्याचा देशातील काही राज्यांमध्ये विरोध होताना दिसत आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालपाठोपाठ आता केरळ राज्यातही या कायद्याला विरोध केला जातोय.

ज्या नागरिकांना नागरिकत्व घ्यायचं आहे ते ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि पारसी लोकांचे शोषण होत असेल तर त्या लोकांना भारतीय नागरित्व मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • Indiancitizenshiponline.nic.in

  • CAA 2019 अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी 'क्लिक' पर्यायावर क्लिक करा.

  • तुमचा मोबाईल नंबर, कॅप्चा कोड एंटर करा आणि पुढील पेजवर जा.

  • पुढील पेजवर तुमचा ईमेल आयडी, नाव आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • OTP (वन टाइम पासवर्ड) साठी तुमचा ईमेल आणि मोबाईल तपासा.

  • OTP टाका आणि त्यांची पडताळणी करा. अतिरिक्त पडताळणीसाठी कॅप्चा कोड पुन्हा-एंटर करा.

  • पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, तुमची वापरकर्ता नोंदणी पूर्ण होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT