सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आता महिलाही देऊ शकणार NDA परीक्षा  Saam Tv
देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आता महिलाही देऊ शकणार NDA परीक्षा

सर्वोच्च न्यायालयाने सध्या महिला उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (NDA) दरवाजे खुले केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सध्या महिला उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (NDA) दरवाजे खुले केले आहे. न्यायालयाने मुलींना ५ सप्टेंबरला होणाऱ्या, परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. याचिकेत एनडीएमध्ये पात्र महिला उमेदवारांच्या प्रवेशासाठी परवानगी मागण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश जारी करून, याला परवानगी दिली आहे. मात्र, एनडीएमध्ये प्रवेश मिळेल की नाही, हे न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांनी अंतिम आदेश जारी केले आहे. याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, महिलांना एनडीए मध्ये सामील होण्यापासून दूर ठेवणे संविधानाच्या कलम 14, 15, 16 आणि 17 चे उल्लंघन ठरते.

हे देखील पहा-

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, महिला उमेदवारांना लिंगाच्या आधारावर एनडीएमध्ये प्रवेशाची संधी नाकारली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी या बाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता मुलींना देशातील सर्व लष्करी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. एनडीए मध्ये दरवर्षी पोहोचणारी, बहुतेक मुले लष्करी शाळेमधील आहेत. अशा परिस्थितीत जर NDA मध्ये मुलींच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला, तर सैनिक शाळेतील आणखी महिला NDA मध्ये दिसू शकतील.

२०२० मध्ये, सशस्त्र दलातील महिला अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कायमस्वरूपी कमिशन देण्यात आले आहे. न्यायालयाने, मागील वर्षी १७ फेब्रुवारी दिवशी आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये, केंद्राने शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या सर्व सेवा करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. मग त्यांनी १४ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा २० वर्षे सेवा केली आहे. केंद्राने नोव्हेंबरमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली होती. यानंतर, लष्करी महाविद्यालये शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याची मागणी जोर धरू लागली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT