Supreme Court X
देश विदेश

NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

NEET-PG: काही वर्षापासून नीट पीजीसारखी परीक्षा दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Bharat Jadhav

सुप्रीम कोर्टाने NEET-PG २०२५ च्या परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतलाय. नीटी-पीजी २०२५ ची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन्सला दिले आहेत. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या एनबीईचा निर्णय कोर्टाने फेटाळत हा मनमानी आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्णय असल्याचं म्हटलंय.

सुप्रीम कोर्टानं एनबीईला निर्देश देत म्हटलंय की, बोर्डानं पारदर्शकपणे परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था केली जावी. परीक्षा येत्या १५ जूनला होणार असून त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ आहे. दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्द्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल, असं कोर्टाने सांगितलंय.

जर परीक्षा मंडळाने अधिक केंद्रे ओळखण्याचा संदर्भ दिला तर त्याला अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे परीक्षा आयोजित करण्यास विलंब होऊ शकतो. सर्व परिणामी केंद्र आणि प्रवेश इत्यादी गोष्टी या न्यायालयाने ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेनुसार होणार नाहीत, असा प्रतिवादींच्या वतीने एक युक्तिवाद मांडण्यात आला. कोर्टानं हा युक्तिवाद फेटाळून लावलाय.

काही वर्षापासून नीट पीजीसारखी परीक्षा दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात होत्या. सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची कठीण पातळी पूर्णपणे समान मानता येत नाही. ही परिस्थती असमानता आणि मनमानी निर्माण करते. या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणं आवश्यक आहे, असं कोर्टानं म्हटलंय.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. सर्व उमेदवार एकाचवेळी एकसारखेच प्रश्नावलीत परीक्षा देऊ शकतात, त्यामुळे ही परीक्षा पद्धत निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

Maharashtra Live News Update: चंद्रकांत पाटील उद्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार, कायदा व सुव्यवस्थेच्याबाबत घेणार आढावा

Ladki Bahin Yojana: दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार? केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच e-KYC पूर्ण

SCROLL FOR NEXT