CJI DY Chandrachud Saam Tv
देश विदेश

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

CJI DY Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड हे कडक शिस्तीचा पालन करणारे आहेत. न्यायालयात नियमांचे पालन होत नसल्यास ते ज्येष्ठ वकिलांनाही धारेवर धरत असतात. आत्ताही त्यांनी जेष्ठ अधिवक्ता रोहतगी यांना खडेबोल सुनावलंय.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: घसा खराब झालाय, सुनवाणीनंतर घ्या, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडे नवी तारीख मागणाऱ्या ज्येष्ठ वकील रोहतगींना सरन्यायाधीशांनी जबरदस्त उत्तर दिलंय. 'आज घशाला आराम द्या आणि आजचं मानधनही विसरा', असं म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगींना खडेबोल सुनावलेत. नेमकी घटना काय आहे हे जाणून घेऊ.

एका सुनावणीदरम्यान सरन्यायधीश डीवाय चंद्रचूड वरिष्ठ अधिवक्ता रोहतागी यांना खडसावलंय. सरन्यायाधीश चंद्रचूड हे कडक शिस्तीचा पालन करणारे आहेत. न्यायालयात नियमांचे पालन होत नसल्यास ते ज्येष्ठ वकिलांनाही धारेवर धरत असतात. आत्ताही त्यांनी जेष्ठ अधिवक्ता रोहतगी यांना खडेबोल सुनावलंय.

नेहमीप्रमाणे आज सोमवारीदेखील सर्वोच्च न्यायालयात सुनवाणी पार पडत होत्या. ज्येष्ठ अधिवक्ता मुकूल रोहतगी यांच्याकडे असलेल्या एका खटल्याची सुनावणी आज सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत होती. तर रोहतगी आपल्या पक्षकारांकडून बाजू मांडत होते. परंतु त्याच्या गळा बसला होता म्हणजे त्यांच्या घशाला त्रास होत होता. त्यांना बोलण्यास त्रास होत होता. त्याचवेळी सुनावणी सुरू करण्याचा पुकारा झाला. त्यावेळी अधिवक्ता रोहतगी यांनी न्यायालयासमोर एक विनंती मांडली.

'माझा घसा बसलाय त्यामुळे ही सुनावणी स्थगित करावी. किंवा ही सुनावणी पुढील आठवड्याच्या सोमवारी घ्यावी', अशी विनंती केली. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने रोहतगी यांची विनंती नम्रपणे ऐकून घेतली. त्यानंतर सरन्यायाधीश यांनी त्यांना सणसणीत उत्तर दिलं. ठीक आहे, तुम्ही तुमचं आजच्या संध्याकाळचं मानधन विसरा असं खणखणीत उत्तर सरन्यायाधीशांनी दिलं.

तुमचा आवाज कमी करा. नाहीतर कोर्टातून बाहेर काढीन- सरन्यायाधीश

वकिलांना सरन्यायाधीशांनी सुनावल्याची आधीही घडलीय. वागणुकीवरुन आणि न्यायालयात जोरजोरात बोलण्यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना धारेवर धरलं होतं. याचिकेच्या लिस्टिंगबाबत वकिलाकडून बाजू मांडली जात पक्षकार वकील मोठ्या आवाजात बोलत होते. त्यावेळी वकिलांना रोखत सरन्यायाधीश म्हणाले, ‘तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आहात. आवाज चढवून बोलू नका. तुमचा आवाज कमी करा. नाहीतर कोर्टातून बाहेर काढीन,’ असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT