SC On Ending 26-week Pregnancy: आम्ही जिवंत गर्भाला मारू शकत नाही: सर्वोच्च न्यायालय

Supreme Court: आईच्या पोटातील बाळाला मारू शकत नाही. महिलेने इतकी दिवस वाट पाहिली, आता ती थांबू शकत नाही का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केलाय.
Supreme Court
Supreme CourtSaam Tv
Published On

SC On Ending 26-week pregnancy:

गर्भवस्थेचे २६ आठवडे पूर्ण केलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं नाकारलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी हा निर्णय दिलाय. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी याचिका कर्त्या महिलेच्या वकिलाला प्रश्न केला. २६ आठवडे वाट पाहिल्यानंतर आता काही दिवस थांबता येणार नाही का? असा प्रश्न न्यायाधीशांनी केला. (Latest News)

निकाल देताना खंडपीठाने म्हटलं की, आपण जन्मलेल्या मुलाचे हक्क आणि आईच्या अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. ते जिवंत गर्भ आहे. तुमची इच्छा आहे का, आम्ही एम्सच्या डॉक्टरांना त्याचे हृदय थांबवण्यास सांगावं. तर आम्ही तसे करू शकत नाही. आम्ही कोणत्याही बाळाला मारू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एएसजी ऐश्वर्या भाटी आणि महिलेच्या वकिलाला यासंदर्भात अर्ज केलेल्या महिलेशी बोलण्यास सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सुनावणीमधील मुद्दे

सुनावणीदरम्यान गर्भवती महिलाही तिच्या पतीसह हजर होती. सुनावणी दरम्यान कोर्टाने वकील आणि एएसजी यांना विचारले की, तुम्ही दोघेही आई आणि सरकारच्या वतीने आला आहात. जन्मलेल्या मुलाच्या हक्कासाठी कोण वकिली करत आहे? आपण ते कसे संतुलित कराल? न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, AIIMSचे म्हणणं आहे की जर तुम्ही आणखी काही आठवडे वाट पाहिली तर बाळाच्या जन्माची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.

एक म्हणजे गर्भाचे हृदय थांबवणे - याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने एम्सला भ्रूणहत्या करण्यास सांगावे. दुसरा पर्याय म्हणजे विकृती असलेल्या बाळाला जन्म देणे. तुमचा क्लायंट यासाठी तयार आहे का? आम्ही तुम्हाला वेळ देत आहोत. आम्ही मागे हटणार नाही. तुम्ही बाईंशी बोला, उद्या विचार करू. यावर एएसजी भाटी म्हणाल्या की, याचिका कर्ती महिला स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. तो खूप अशक्त आहे. आम्ही तिचे समुपदेशन करण्याचाही प्रयत्न केला. एकदा तिने होकार दिला आणि आता ती नकार देत आहे. हा निर्णय तिच्या आरोग्यासाठीही घातक आहे.

तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. यावर बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ही महिला अल्पवयीन पीडित आहे, असेही नाही. त्याचे लग्न झाले आहे. तुम्ही २६ आठवडे काय करत होता? तिला दोन मुले आहेत, त्याचे परिणाम तिलाही माहीत आहेत. तुम्ही ८आठवडे वाट पाहिली ते सामान्य बाळ असण्याची शक्यता आहे.

Supreme Court
Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालय राज्यपालांच्या भूमिकेवर नेमके काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com