CJI Dhananjaya y. chandrachud  Saam Digital
देश विदेश

Bengal School Jobs Scam: लोकांचा विश्वासच उडेल! शिक्षक भरती घोटाळ्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांची तिखट टिप्पणी

West Bengal Teacher Recruitment Scam : सुप्रीम कोर्टात २५ हजार शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगालच्या सरकारला अनेक प्रश्न केले.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात २५ हजार शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगालच्या सरकारला अनेक प्रश्न केले.

सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगाल सरकारने शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नेमणूक केली,यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न अनेक प्रश्न उपस्थित केले. पश्चिम बंगालच्या सरकारने वकील नीरज किशन कौल यांनी म्हटलं की, सीबीआयने २५ हजार शिक्षकांच्या नियुक्ती अवैध नसल्याचं काही म्हटलं नाही'.

पश्चिम बंगालच्या दुसऱ्या वकील जयदीप गुप्ता यांनी म्हटलं की, हायकोर्टाचा शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय हा निकाल चुकीचा आहे. हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रातील हा निर्णय नव्हता'. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, 'भरतीशी निगडीत सर्व प्रती नष्ट करण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं काय झालं? असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर वकिलांनी आता त्या प्रती मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.

'भरतीचं आयोजन करणाऱ्या आयोगाने डिजिटल स्वरुपात तरी या पत्रिका तुमच्या जवळ ठेवायला पाहिजे होत्या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. या प्रकरणात अशी परिस्थिती असेल तर लोकांचा विश्वास उडेल', असे सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटलं.

तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यात २५ हजारांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशाला देखील स्थगिती दिली होती. हायकोर्टाचं म्हणणं होतं की, नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना वेतन देखील पुन्हा देण्यास सांगितलं होतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून या शिक्षकांना दिलासा न मिळाल्यास त्यांना वेतन पुन्हा शासनाला द्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

SCROLL FOR NEXT