Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

Loksabha Election 2024: मध्यप्रदेशातील धार येथील सभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करताना ४०० पार कशासाठी पाहिजे? याबाबत थेट विधान केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Digital

देशभरात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभेत ४०० पारचा नारा देत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावला आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी देशभरात प्रचार दौरे करत असून त्यामधून ते थेट काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधताना दिसत आहेत. मध्यप्रदेशातील धार येथील सभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करताना ४०० पार कशासाठी पाहिजे? याबाबत थेट विधान केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मध्य प्रदेशातील धार येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला. "विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांना ना जनेतेची काळजी आहे ना देशहिताची," असा टोला लगावत त्यांनी परिवार वादावरुन विरोधकांवर जोरदार टीका केली.

"आज काम करणाऱ्याला गादी मिळाली अन् नामधाऱ्याला गादीवरुन पायउतार व्हावे लागले. हे बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे. हे संविधानाचे बलस्थान आहे. तसेच संविधान बनवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान आहे," असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संविधान बदलण्याच्या आरोपावरुनही जोरदार प्रत्यूत्तर दिले.

PM Narendra Modi
Arvind Kejriwal SC Hearing : अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून, अटकेनंतरच्या ४८ दिवसांत काय घडलं?

"आमचे विरोधक विविध प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. एनडीएने ४००चा आकडा पार केल्यास राज्यघटना बदलली जाईल, अशी अफवा काँग्रेसने पसरवली आहे. मात्र संविधान बदलण्यासाठी नव्हेतर काँग्रेसने आपल्या मतदारांना ओबीसी म्हणून घोषित करू नये यासाठी आपल्याला ४०० चा आकडा पार करणे आवश्यक आहे, " असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

PM Narendra Modi
PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिमांना केलं सावध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com