Arvind Kejriwal SC Hearing : अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून, अटकेनंतरच्या ४८ दिवसांत काय घडलं?

Arvind Kejriwal Bail News: आज सर्वोच्च न्यायालयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली आहे. अटक केल्यापासुन आतापर्यंत काय घडलंय, ते आपण जाणून घेऊ या.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Saam Tv

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

आज सर्वोच्च न्यायालयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली (Arvind Kejriwal SC Hearing) आहे. निवडणुका लक्षात घेवून जामिनाचा विचार करत असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तुरूंगात आहेत. आज त्यांच्या अटकेला ४८ दिवस पूर्ण होत आहेत. या ४८ दिवसांच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या ते पाहू या.

२१ मार्च रोजी अटक केल्यानंतर केजरीवाल यांना दुसऱ्याच दिवशी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने केजरीवाल (Excise policy scam case update) यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता.

सात दिवसांच्या ईडी कोठडीनंतर पुन्हा १ एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या राऊज एव्हीन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. केजरीवाल यांचा लाचखोरी प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचं सांगत कोर्टाने त्यांची अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनी-अमेरिकेनंतर संयुक्त राष्ट्रांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.

Arvind Kejriwal
Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

२२ एप्रिल रोजी कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतच्या (arvind kejriwal bail news) याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाने मागणी फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना ७५ हजारांचा दंड ठोठावला होता. तसंच त्यांची उपचाराची मागणी करणारी याचिका देखील फेटाळण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना जामीन मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी ईडीने ६० दिवसांच्या आतमध्ये आरोपपत्र सादर करणार असल्याचं सांगितलं होतं.

ईडीने सुप्रीम कोर्टाकडे अरविंद केजरीवाल तपासत सहकार्य करत नसल्याची तक्रार २५ एप्रिल रोजी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याची तपासणीसाठी AIIMS च्या ५ डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाची तपासणी करण्यात आली (arvind kejriwal news today) होती. दरम्यान केजरीवाल यांना तिहारच्या तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला होता. त्यानंतर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी खलिस्तानी फंडिंग प्रकरणी एनआयएने तपास करावा, अशी मागणी केली होती.

Arvind Kejriwal
Arvind Kejariwal: अरविंद केजरीवाल तपासत सहकार्य करत नाहीत, ईडीची सुप्रीम कोर्टाकडे तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com