PM Narendra Modi:
PM Narendra Modi:Yandex

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिमांना केलं सावध

Loksabha Election 2024: विचार करा, देश एवढा प्रगती करत आहे, जर आपल्या समाजात कमतरता जाणवत असेल तर त्याची कारणे काय आहेत? याचा शोध घ्या," असा सल्ला पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

दिल्ली|ता. ७ मे २०२४

देशभरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभा निवडणुकांंच्या प्रचारात मुस्लिम आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुस्लिम बांधवांना खास आवाहन करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"मी मुस्लिम समाजातील सुशिक्षित लोकांना आव्हान करतोय, तुम्ही आत्मपरीक्षण करा. गुजरातमध्ये १० पैकी ७ वर्षात दंगली झाल्या पण २००२ नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झालेली नाही. याआधी मी या विषयांवर बोलत नव्हतो. मी मुस्लिम समाजाला सांगत आहे. सुशिक्षित लोकांनी आत्मपरीक्षण करावे. विचार करा, देश एवढा प्रगती करत आहे, जर आपल्या समाजात कमतरता जाणवत असेल तर त्याची कारणे काय आहेत? याचा शोध घ्या," असा सल्ला पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

मुलांचे भविष्य खराब करत आहात...

तसेच "काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी योजनांच लाभ का मिळाला नाही? काँग्रेसच्या काळात तुम्ही या दुर्दशेला बळी पडलात का? एकदा आत्मपरीक्षण करून निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला सत्तेत बसवू, आम्ही तुम्हाला काढून टाकू, असे तुमच्या मनात असले तरी तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य खराब करत आहात," असा सावधतेचा इशाराही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

PM Narendra Modi:
Shinde vs Thackeray : हातकणंगलेत हायव्होल्टेज राडा! शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी

"सध्या योगा करण्याबाबत बोलल्यानंतरही हिंदू- मुस्लिम वाद उभा राहतो. इथे त्यांनी हिंदू-मुस्लिम असा योगही केला आहे, आता ते जे काही करत आहेत, मी मुस्लिम समाजाला विनंती करतो की, किमान त्यांच्या मुलांच्या आयुष्याचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करा. कोणत्याही समाजाने बंधपत्रित कामगारासारखे जगावे अशी माझी इच्छा नाही. कारण तुम्हाला कोणीतरी घाबरवत आहे, .." असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi:
Kolhapur: हिरण्यकेशी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com