Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

Arvind Kejriwal Arrested: न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याप्रकरणी अंतिम निर्णय कोर्टाने राखून ठेवला असून दुपारी दिला जाण्याची शक्यता आहे.
CM Arvind Kejriwal
CM Arvind KejriwalSaam TV

दिल्ली|ता. ७ मे २०२४

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याप्रकरणी अंतिम निर्णय कोर्टाने राखून ठेवला असून दुपारी दिला जाण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी आजच्या सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई अन् अटकेवरुन ईडीला सवाल केले.

ईडीची बाजू मांडणारे एएसजी राजू यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, मनीष सिसोदिया यांचा जामिन रद्द झाल्यानंतर 1100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यावर न्यायमूर्ती खन्ना यांनी हा 100 कोटींचा भ्रष्टाचार आहे असे तुम्ही सांगितले होते मग 2-3 वर्षात 1100 कोटी रुपये कसे झाले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच सुप्रीम कोर्टाने ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यापूर्वीची फाईलही मागवण्यात आली आहे. तसेच दोन वर्षांपासून तपास सुरू असल्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली. कोणत्याही तपास यंत्रणेने दोन वर्षे अशा प्रकारे तपास सुरू ठेवणे योग्य नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले.

CM Arvind Kejriwal
Raigad Lok Sabha: मतदानासाठी घरातून निघाला, रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडला; महाडमध्ये मतदाराचा मृत्यू

एएसजी राजू यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी १०० कोटींची मागणी केल्याचे आम्ही दाखवू शकतो. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले नाही. तपास यंत्रणा त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. तपास जसजसा पुढे गेला तसतशी त्यांचा सहभाग स्पष्ट होत गेला.

CM Arvind Kejriwal
Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com