Supreme Court  Saam Tv
देश विदेश

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Supreme Court News : आतापर्यंत झालेल्या ४ टप्प्यातील आकडेवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय, असा सवाल सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केला आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : मतदानाच्या टक्केवारीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टात याचिका पार पडली. मतदानानंतर ४८ तासांच्या आत मतांची टक्केवारी जाहीर करण्याचे निर्देश द्या, असं म्हणत सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडली. आतापर्यंत झालेल्या ४ टप्प्यातील आकडेवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय, असा सवाल सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केला आहे.

मतांच्या टक्केवारीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरून सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान युक्तिवाद कोर्टाने म्हटलं की, प्रत्येक मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून फॉर्म १७ सी हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या दिवशी जमा केला जातो. जर तो दुसऱ्या दिवशी जमा केला जात असेल, तर तो अपलोड का केला जात नाही ?असा सवाल उपस्थित केला होता.

मतांच्या टक्केवारीवरून 'एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा खंडपीठाने या संदर्भात निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

आता या नोटिशीला एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. आता आता या प्रकरणावर समर व्हेकेशनच्या एका बेंचकडे २४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT