Swati Maliwal Case : मोठी बातमी! स्वाती मालीवाल प्रकरण; CM अरविंद केजरीवालांचा माजी पीए विभव कुमार यांंना अटक

Swati Maliwal Case News : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी विभव कुमार यांना ताब्यात घेतलं आहे.
CM केजरीवाल यांचा पीए पोलिसांच्या ताब्यात
Swati Maliwal Case Saam tv

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे. मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. विभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए होते, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांना मालीवाल यांना मारहाण करणे भोवलं आहे. मालीवाल यांच्या मारहाणीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे. विभव कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दिले जात नाही, असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे.

CM केजरीवाल यांचा पीए पोलिसांच्या ताब्यात
Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

विभव कुमार यांना सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर आपचे लीगल सेल प्रमुख संजीव नासीयार यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी रोखलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, विभव कुमार यांनी तक्रारीचा मेल दिल्ली पोलिसांना केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा आयपी अॅड्रेस ट्रॅक केला. त्यानंतर पोलिसांचं पथक विभव कुमार यांच्या मागावर होतं. पोलिसांच्या पथकाने विभव कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर अटक केली.

CM केजरीवाल यांचा पीए पोलिसांच्या ताब्यात
Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

दरम्यान, १३ मे रोजी स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. विभव कुमार हे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए होते. मालीवाल यांच्या तक्रारीनंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं. तर त्यांच्या विरोधात एफआयआर देखील नोंदविण्यात आला. मालीवाल यांनी शुक्रवारी कोर्टात साक्ष देताना गंभीर आरोप केले. पोलिसांकडून विभव कुमार यांचे लोकेशन ट्रेस करण्यात येत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com