Sunita Williams  Saam Digital
देश विदेश

Sunita Williams : सुनीता विल्यम्ससंदर्भात 'बॅड न्यूज'! नासाकडून धक्कादायक खुलासा

Sandeep Gawade

नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांनी बोइंग कंपनीच्या ‘स्टारलायनर’ अंतराळ यानातून अवकाशात दोन महिन्यांपूर्वी झेप घेतली होती. अंतराळवीरांना घेऊन ५ जून रोजी हे अंतराळयाने अवकाशात झेपावलं होतं. मात्र या यानात हेलीयमची गळती सुरू झाल्यामुळे आठवडाभराच्या मोहीमेसाठी गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन महिन्यांपासून अडकून पडले आहेत. आता नासाने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

हेलियम लिकेज व डॉकिंग सिस्टमममध्ये बिघाड झाल्यामुळे यानं पृथ्वीवर परतलेलं नाही. त्यांच्या दुरुस्तीसाठी अधिक वेळ लागणार आहे. नासाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. नासाने मिशन क्रू ९ हाती घेतलं आहे. या मोहिमेंतर्गत अवकाशयान अवकाशात झेपावणार आहे. याच मोहिमेंतर्गत दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणता येईल, मात्र तोपर्यंत २०२५ उजाडणार आहे. यासाठी एलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी देखील सहकार्य करणार आहे, अशी माहिती कमर्शियल क्रू प्रोग्रामचे संचालक स्टीव्ह स्टिच यांनी दिली आहे.

नासाने अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 8 दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात पाठवलं होतं. दोघंही 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते, मात्र यानात बिघाड झाल्यामुळे प्रतीक्षा वाढतच गेली. आज त्यांना अंतराळात जाऊन जवळपास 54 दिवस पूर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत सुनीता विल्यम्स कधी परतणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या स्टारलाइन यानातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळ मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं, त्या यानात हेलियम गळती सुरू झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर डॉकिंग करताना त्याचं थ्रस्टर्सही निकामी झालं.

दरम्यान अंतराळवीरांना दीर्घकाळ राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्याची नासाला घाई नाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी NASA कडे अजून 60 दिवसांचा अवधी असल्याचं म्हटलं आहे. मात्र आता २०२५ पर्यंत हा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नासासाचंही टेन्शन वाढलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT