Nashik News : महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार?; चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार

Nashik Mahindra Company Project Shift To Gujrat : नाशिक महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आक्रमक झाली आहे.
Mahindra Company Project
Mahindra Company ProjectSaam Digital
Published On

महाराष्ट्र आणि मुबंईतून अनेक प्रकल्प गुजरातला नेले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधक सरकारला याविषयावरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आक्रमक झाली आहे.

Mahindra Company Project
Ambadas Danve : 'हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं'; अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला

इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रकल्प असल्याची माहिती असून महिंद्रा कंपनीचे मदर युनिट नाशिकमध्ये आहे तर प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. प्रारंभी हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाण्याची होती चर्चा होती, मात्र मात्र नंतर हा प्रकल्प अचानक गुजरातला उभारण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आक्रमक झाली असून प्रकल्प गुजरातला न जाऊ देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं संघटनेने म्हटलं आहे.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत इलेक्ट्रॉनिक पार्टस, बॅटरी प्रकल्पासाठी २५ हजार कोटींचा करार शासनासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीची बातमी सुद्धा आली आहे. अत्यंत खेदजनक अशी ही बातमी नाशिककरांसाठी आहे. गेल्या वर्ष आणि दोन वर्ष महाराष्ट्रातील मोठी गुंतवणूक गुजरातला जात आहे. नाशिककरांची मोठ्या प्रकल्पाची मागणी असूनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या या युनीटमध्ये सर्व मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकमध्ये असल्यामुळे हा प्रकल्प नाशिकमध्येच रहावा, अशी मागणी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केली आहे.

Mahindra Company Project
Kalyan Dombivli : ३ महायुती, १ मनसे, चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय झुंबड, महायुती अन् मविआचा कस लागणार!

महायुतीचे नेते दिल्लीपतींच्या डोळ्यात डोळे घालून का बोलत नाही? : अमोल कोल्हे

महाराष्ट्रातील महायुतीचे नेते दिल्लीपतींच्या डोळ्यात डोळे घालून का बोलत नाही? महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जात असताना विरोध का करत नाहीत? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीपतींना दिलेलं हे गिफ्ट आहे का? आधीही अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देतात, गुजरात म्हणजे पाकीस्तान आहे का?. स्पोर्ट सीटी गुजरातला नेली. त्यांना मोठा निधी दिला. पण ॲालिम्पिकमध्ये पदके आणली ती हरीयानाने. हरीयानाला फक्त दहा टक्के निधी खेळांसाठी दिला, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

Mahindra Company Project
Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com