Amit Shah News Saam Tv
देश विदेश

Amit Shah News: उत्तर प्रदेशमधील मोठा चेहरा NDA मध्ये सामील; गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

Shivani Tichkule

Om Prakash Rajbhar Joins NDA: आगामी निवडणुका लक्षात ठेवून सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

राजभर एनडीएमध्ये दाखल झाल्याने पक्ष आणखी बळकट होईल, असे ट्विट त्यांनी केले आहे. यापूर्वी 14 जुलै रोजी दोन्ही नेत्यांची भेटही झाली होती.गेल्या काही दिवसांपासून ओम प्रकाश राजभर हे युतीत सामील होऊ शकतात अशी चर्चा रंगली होती. आज अखेर राजभर एनडीएमध्ये दाखल झाले आहे. (Latest Marathi News)

अमित शाह ट्विटमध्ये नेमकं काय म्हणले?

ओम प्रकाश राजभर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये मी त्यांचे स्वागत करतो. राजभरजी यांच्या येण्याने उत्तर प्रदेशमध्ये एनडीए (NDA) बळकट होईल.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएकडून गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, असं ट्विट अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे.ओपी राजभर यांनीही ट्विट करून याला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.

कोण आहेत ओम प्रकाश राजभर?

ओम प्रकाश राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशमधील जहूराबादमधून ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2017 ला ते जहूराबादमधूनच आमदार होते. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत.

2017 ला ते मागासवर्ग कल्याण विभाग आणि अपंग लोक विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री होते. पण त्या काळात ओम प्रकाश राजभर यांच्यावर युती धर्म मोडल्याचा आरोप ठेवण्यात आला.त्यानंतर 20 मे 2019 ला त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलं. मग 2022 ला त्यांना सपासोबत जात निवडणूक लढली होती. त्यानंतर आता ते एनडीएमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT