मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Supreme Court Slams BMC Commissioner : अतिक्रमण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय आहे, हे जाणून घ्या.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना जोरदार झटका दिला. सुप्रीम कोर्टाने मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना तब्बल 5 लाखांचा दंड ठोठावलाय. मुंबईतील बेस्ट बस डेपोसाठी राखीव जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. कोर्टाच्या दोन जुन्या आदेशांचे पालन न केल्याने सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिका आयुक्तांना अवमानना नोटीस देखील दिलीय.

बेस्ट बसस्थानकासाठी निश्चित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कोर्टाच्या आदेशाचे पालन न करणे आयुक्तांना भोवले आहे. याप्रकरणी कोर्टाने आयुक्तांविरोधात कोर्टाचा अवमान कार्यवाही सुरू केलीय. त्यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेशही दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.