सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

NCP Internal Tensions: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगिरी निवासस्थानी मागील दोन तासांपासून सुरू असलेली आमदारांची बैठक संपली आहे.सुनेत्रा पवारांनी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला २० पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते.
Sunetra Pawar calls meeting of NCP MLAs after Amit Shah meeting
Sunetra Pawar calls meeting of NCP MLAs after Amit Shah meetingsaamtv
Published On: 
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण

  • सुनेत्रा पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली.

  • बैठकीला २० पेक्षा अधिक आमदार उपस्थित असल्याची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटू लागलेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज आमदारांची बैठक बोलवली. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाची गेल्या दोन तासांपासून महत्त्वाची बैठक सुरू असून, या बैठकीला २० पेक्षा अधिक आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीत आमदारांनी आपल्या अडचणी आणि मनातील भावना वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडलेत.

बैठकीदरम्यान पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्थानिक नेत्यांना फटका बसतोय. त्यांना वरील पातळीवर काय चालू याची माहिती मिळत नसते, असा मुद्दाही आमदारांनी बैठकीत उपस्थित केला. वरिष्ठ नेत्यांमध्ये नेमके काय वाद सुरू आहेत, याबाबत आम्हाला खालच्या स्तरावर काहीच माहिती मिळत नाही, अशी भावना काही आमदारांनी व्यक्त केली. वरिष्ठ नेत्यांमधील मतभेदांच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्याने त्याचा परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत असून पक्ष कमजोर होत असल्याची चिंताही आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Sunetra Pawar calls meeting of NCP MLAs after Amit Shah meeting
महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेतृत्वात बदल! विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मोठी उलटफेर, 'या' नेत्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी असतानाही आमदारांची कामे होत नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षित कामे होत नसल्याची नाराजी काही आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्तेत असूनही मतदारसंघातील प्रश्न सोडवताना अडचणी येत असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चेला आल्याचे सांगितले जात आहे.

Sunetra Pawar calls meeting of NCP MLAs after Amit Shah meeting
मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

दरम्यान, पक्षातील एका माजी मंत्र्यांनी अर्थमंत्रीपदाबाबत नेमके काय घडले, याविषयीही बैठकीत प्रश्न उपस्थित केल्याची माहिती आहे. अर्थमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून पक्षात नेमकी कोणती चर्चा सुरू आहे, याबाबत त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे विचारणा केल्याचे समजते. एकीकडे वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद, दुसरीकडे आमदारांच्या कामांबाबतच्या तक्रारी आणि अर्थमंत्रीपदाचा मुद्दा यामुळे देवगिरीवरील बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदारांनी मांडलेल्या नाराजीवर वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेते आणि या बैठकीतून कोणता निर्णय समोर येतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.