Scene of devastation after RSF drone strike on a kindergarten in Sudan’s Kordofan region. saam tv
देश विदेश

Sudan Civil War: निमलष्करी दलाचा एका अंगणवाडीवर ड्रोन हल्ला; ३३ मुलांसह ५० जण ठार

Sudan Civil War: सुडानच्या कोर्डोफान राज्यातील एका अंगणवाडीवर ड्रोन हल्ला करण्यात आलाय. यात ३३ मुलांसह ५० जणांचा मृत्यू झाला आहे. आरएसएफ आणि सुडानी सैन्यांमधील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • कोर्डोफान राज्यातील अंगणवाडीत आरएसएफचा भीषण ड्रोन हल्ला.

  • हल्ल्यात ५० जण ठार, त्यात ३३ लहान मुलांचा समावेश.

  • सुडानमध्ये दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची ही धक्कादायक घटना.

सुडानच्या निमलष्करी दलाने देशातील दक्षिण-मध्य भागातील कोर्डोफान राज्यातील कलोगी शहरातील एका अंगणवाडीत ड्रोन हल्ला केलाय. या हल्ल्यात ५० जणांचा मृत्यू झालाय. यात ३३ मुलांचा समावेश आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री घटनास्थळी पोहोचलेल्या पॅरामेडिकल पथकाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिलीय.

ड्रोन हल्ल्यांमुळे या भागातील संपर्क पूर्णपणे तुटला होता. मृतांचा नेमका आकडा किती आहे, याची अधिकृत माहितीये. आता हाती आलेल्या माहितीनुसार, ५० जणांचा मृत्यू झालाय, परंतु मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुडान देशात आरएसएफ आणि सुडान सैन्यात गृहयु्द्ध सुरू आहे, गेल्या दोन वर्षापासून यांच्यात संघर्ष सुरू आहे. गुरुवारी झालेला हल्ला आरएसएफ आणि सुडानी सैन्य यांच्यातील संघर्षाची नवीन सुरुवात आहे. हा संघर्ष आता तेलाने समृद्ध असलेल्या कोर्डोफान प्रदेशात केंद्रित झालाय.

मुलांच्या हक्कांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था युनिसेफने या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. "शाळेत मुलांची हत्या करणे हे मुलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, असे युनिसेफचे सुदान प्रतिनिधी शेल्डन येट यांनी म्हटलंय. युद्धात मुलांना ओढायला नको. हल्ले ताबडतोब थांबवण्यात यावे. गरजू लोकांपर्यंत मदत सुरक्षित, कोणता अडथळा न येऊ देता पोहोचू दिली पाहिजे. मागील काही आठवड्यात कोर्डोफानच्या अनेक भागात हल्ले झालेत. त्यात अनेकांचा मृत्यू झालाय.

आरएसएफने अल-फशेर शहरावर कब्जा केला तेव्हा युद्धाचे ठिकाण दारफुरहून दुसरीकडे हलवण्यात आली. गेल्या आठवड्यात ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. रविवारी दक्षिण कोर्डोफानमधील कौडा येथे सुडान सैन्याच्या हवाई हल्ल्यात किमान ४८ लोक मृत्युमुखी पडले, ज्यात बहुतेक नागरिक होते. आरएसएफने अल-फॅशरवर कब्जा केला तेव्हा, नागरिकांच्या हत्या, बलात्कार आणि इतर जघन्य गुन्ह्यांची नोंद झाली होती. तेथून हजारो लोक पळून गेले होते. अजून त्या शहरात हजारो लोक मृत किंवा अडकल्याची भीती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेच्या अकोला–नांदेड–सिकंदराबाद मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड

Sunday Horoscope: मेहनतीशिवाय फळ नाही हे कळेल, ५ राशींना पैशाची तंगी भासेल, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

इंडिगोचा हवाई गोंधळ, अफ्रिकन महिलेचा काउंटरवर चढून थयथयाट, पाहा VIDEO

Kobi Chanadal Bhaji: लग्नात बनवतात तशी कोबी चणाडाळ भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची?

Ratnagiri Travel : नवीन वर्षाची सुरुवात होईल खास; प्लान करा कोकण ट्रिप, रत्नागिरीतील 'हे' ठिकाण बेस्ट

SCROLL FOR NEXT